Virat Kohli & Anushka Sharma : विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Virat Kohli and Anushka Sharma) दोघेही नुकतेच मालदीवमध्ये सुट्टी घालवून मुंबईत परतले आहेत. बुधवारी दोघेही मुंबई एअरपोर्टवर दिसून आले (mumbai airport) होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांना एअरपोर्टवर पाहण्यात आलं असून यावेळी वामिकाचा एक फोटोही दिसून आला जो काही फॅन्सनी व्हायरल केला, पण विराट-अनुष्का यांना हे मान्य नसल्याने अनेक जागून हे फोटो काढण्यात आले आहेत. दरम्यान यावेळी विराट अनुष्का हे दोघेही अगजी सिंपल लूकमध्ये दिसून आले. त्यात कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याने दोघांनीही आवर्जून मास्क घातला होता.
सध्या भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) 5 टी20 सामन्यांची मालिका खेळत आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी देण्यात आल्याने वरिष्ठ खेळाडू आराम करताना दिसत आहेत. यामुळेच विराटही फॅमिलीसोबत सुट्टी घालवण्यासाठी परदेशात गेल्याचं दिसून आलं. दोघांनीही आपआपले फोटोही त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअऱ केले होते. यावेळी विराटने एक शर्टलेस फोटो टाकला होता. तर अनुष्काने बिकीनीतील काही फोटो पोस्ट केले आहेत. या दोघांचाही फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
आयपीएलमध्ये विराटचं सुमार प्रदर्शन
यंदाच्या आयपीएल हंगामात (ipl 2022) विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने 15 सामन्यात 22.73 च्या सरासरीने आणि 115.98 च्या स्ट्राईक रेटने 309 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीची सर्वोत्कृष्ट धावसंख्या 73 असून तो तीन वेळा शून्य धावा करुनही बाद झाला आहे.
हे देखील वाचा-