ICC ODI Rankings: आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं म्हणजेच आयसीसीनं एकदिवसीय क्रमवारीका जाहीर केलीय. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ अधिकतर पहिल्या तीनमध्ये पाहायला मिळायचा. परंतु, आता भारताची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. या क्रमवारीत पाकिस्तानच्या संघानं चौथ्या स्थानावर झेप घेतली. पाकिस्ताननं नुकतीच वेस्ट इंडीज यांच्यासोबत खेळण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत 3-0 नं विजय मिळवलाय. 


वेस्ट इंडीजविरुद्ध पाकिस्तानची चकमदार कामगिरी
वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्याअगोदर पाकिस्तानचा संघ 102 गुणांसह आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता. त्यानंतर वेस्ट इंडीजच्या संघाला क्लीन स्वीप दिल्यानं पाकिस्तानच्या संघाचे 106 गुण झाले. ज्यामुळं पाकिस्तानच्या संघानं 105 गुण असलेल्या भारतीय संघाला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. या वर्षी भारतानं आतापर्यंत फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला होता.



पहिल्या क्रमांकावर कोण?
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानावर आहे. सध्या न्यूझीलंडच्या खात्यात 125 गुण आहेत. तर, या क्रमवारीत इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचे 124 गुण आहेत. त्यानंतर 107 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या संघाला मागं टाकण्याचा पाकिस्तानच्या संघाचा प्रयत्न असेल. परंतु, उद्यापासून ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्या खात्यात आणखी गुण जमा करण्याची शक्यता आहे. 


हे देखील वाचा-