Vinod Kambli Update: मुंबईतील वांद्रे येथील निवासी सोसायटीच्या गेटला कारनं धडक दिल्याप्रकरणी भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना आज दुपारी पोलिसांनी अटक केली. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. सोसायटीच्या गेटला धडक दिल्यानंतर विनोद कांबळी यांनी रहिवाशांशी हुज्जत घातली. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात विनोद कांबळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे येथील निवासी सोसायटीच्या गेटला विनोद कांबळी यांच्या कारनं धडक दिली. एवढेच नव्हेतर या घटनेनंतर विनोद कांबळींनी इमारतीचा चौकीदार आणि रहिवाशांशीही वाद घातला. याप्रकरणी रहिवाशांनी वांद्रे पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर विनोद कांबळीवर भारतीय दंड संहिता कलम 279, 336 आणि 427 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.


पीटीआयचं ट्वीट-



याआधीही 2015 मध्ये मोलकरणीनं विनोद कांबळी आणि त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. 2015 मध्ये कांबळी आणि त्याची पत्नी अँड्रिया हेविट यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पैशाच्या मागणीवरून दाम्पत्यानं मोलकरणीला तीन दिवस खोलीत कोंडून ठेवल्याचा आरोप आहे. मात्र, काही काळानंतर हेविटनं या प्रकरणाला नवं वळण दिलं. कांबळी आणि हेविट यांनी मोलकरणीवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप केला होता.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha