IND vs SL 3rd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्डेडिअमवर भारत आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर, भारतीय संघाचा सलामीवीर ईशान किशनला (Ishan Kishan) अखेरच्या सामन्यात विश्रांती देण्यात आलीय.


धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारचा बाऊन्सर ईशान किशनच्या हेल्मेटवर जाऊन आदळला होता. नुकताच ईशान किशनला कंगाला येथील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, ईशान किशनचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल आले आहेत. परंतु, बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमनं त्याला आराम करण्याचा सल्ला दिलाय. ज्यामुळं त्याला आजच्या टी-20 सामन्यातून विश्रांती देण्यात आलीय


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलीय. आजच्या सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेच्या संघाला क्लीन स्वीप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तर, या सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्ध कमबॅक करण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरेल. 


संघ-


भारत प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आवेश खान.


श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, दानुष्का गुणातिलका, चरित असलांका, दिनेश चंडीमल (यष्टीरक्षक), जेनिथ लियानागे, दासुन शानाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, जेफ्री वांडरसे, बिनुरा फर्नांडो, लाहिरू कुमारा.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha