Team India Head Coach Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरला (Gautam Gambhir) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक (Indian Cricket Team Head Coach) म्हणून निवड करण्यात आली आहे.  बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदावरुन राहुल द्रविड टी 20 विश्वचषकानंतर संपल्यानंतर निवृत्त झाले. राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे.


गौतम गंभीर हा भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार हे फार पूर्वीच ठरले होते. जय शाह ट्विट करत म्हणाले की, आधुनिक क्रिकेट सातत्याने बदलत आहे, हे बदल गंभीरनी जवळून पाहिले आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत विविध भूमिका निभावल्या आहेत आणि उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे मला विश्वास आहे की गौतम गंभीर भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहेत. भारतीय संघासाठी त्यांचे स्पष्ट विचार, अफाट अनुभव त्यांना सर्वाधिक मागणी असलेल्या प्रशिक्षकासाठी भूमिका पार पाडण्यास पात्र ठरवते. बीसीसीआयकडून त्यांना नव्या प्रवासासाठी पूर्ण पाठिंबा असेल, असं जय शाह यांनी सांगितले.


5 खेळाडूंचं टीम इंडियात पुनरागमन होणार-


मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीआधी गौतम गंभीरने बीसीसीआयकडे काही आपल्या मागण्या ठेवल्या होत्या. यामध्ये भारतीय क्रिकेट संघावर त्याचे पूर्ण नियंत्रण असेल, असंही गौतम गंभीरने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर 5 खेळाडूंचं नशीब चमकण्याची शक्यता आहे. हर्षित राणा, नितीश राणा, मयंक यादव, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी यांना भारतीय संघात आता स्थान मिळण्याची शक्यता आहे. 


गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द -


गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिलेय. त्यानं टीम इंडियासाठी 147 व-नडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत. वन-डेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळलाय, यामध्ये  4154 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने द्विशतकही ठोकलेय. गौतम गंभीर याने 37 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामद्ये 932 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.


संबंधित बातमी:


Gautam Gambhir : कामरान अकमलवर धावून गेला, भल्या भल्यांना भिडला, वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांनो गौतम गंभीरपासून दोन हात लांबच राहा!