नवी दिल्ली : भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकत आयसीसीच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचं काम टीम इंडियानं केलं. रोहित शर्मानं टी 20 च्या कॅप्टन पदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्मा हाच भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत नेतृत्त्व करेल हे स्पष्ट केलंय. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ सहभागी होणार असल्याचं स्पष्ट आहे. मात्र, यासंदर्भातील विशेष बाब म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला जाणार का हा सवाल अद्याप कायम आहे.


पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडणार आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ एका गटात आहेत. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. दुसऱ्या गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि इंग्लंडचा  समावेश आहे. ही स्पर्धा  19  फेब्रुवारी ते 9  मार्च दरम्यान घेण्यात यावी असा प्रस्ताव पीसीबीनं आयसीसीला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यावेळी देखील एकाच गटात आहेत. मात्र, भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार की आशिया कप प्रमाणं त्रयस्थ ठिकाणी सामने खेळणवण्यास पीसीबीला आणि आयसीसीला भाग पाडणार हे पाहावं लागेल.


पीसीबीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आराखड्यानुसार भारताचे सर्व सामने सुरक्षेच्या दृष्टीनं लाहोरमध्ये आयोजित केले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 1 मार्चला होणार आहे. मात्र, बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ पाकिस्तानला पाठवणार का प्रश्न कायम आहे. 


बीसीसीआय आशिया कपची रणनीती राबवणार?


आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतानं पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जाण्यास नकार दिला होता. त्यामुळं पीसीबी, बीसीसीआय आणि आशिया क्रिकेट काऊन्सिलनं चर्चा करुन मार्ग काढला होता. भारतानं आशिया कप 2023 मध्ये श्रीलंकेत सामने खेळले होते. त्या प्रमाणं यावेळी देखील भारत पाकिस्तानला जाणार की दबाव टाकून भारताचे सामने त्र्ययस्थ ठिकाणी आयोजित करण्यास भाग पाडणार हे पाहावं लागेल. 


दरम्यान, भारतात आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघ आला होता. आता  भारत पाकिस्तानमध्ये जाणार का हे पाहावं लागेल.


संबंधित बातम्या :



Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह अन् स्मृती मानधनाला आयसीसीकडून मानाचं पान, मोठी अपडेट समोर, बुमराहनं मानले आभार