Gautam Gambhir New Head Coach of Indian Cricket Team : भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर याची भारतीय क्रिकेट टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. सामन्यादरम्यान वाकड्या नजरेने पाहाणाऱ्यांना शिंगावर घेणे, हा गौतम गंभीरचा स्थायीभाव आहे. क्रिकेटच्या मैदानावर गौतम गंभीर कामरान अकमल पासून विराट कोहलीपर्यंत अनेकांना भिडला आहे. आयपीएलमध्ये कोणत्याही विजय खेचून आणायचा हा विचार केंद्रस्थानी ठेऊन त्याने कोलकाता नाईट रायडर्सला 2023 मध्ये चॅम्पियन बनवलं होतं. त्यामुळे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांनो  गौतम गंभीरपासून दोन हात लांबच राहा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 


प्राणपणाने लढण्याच्या वृत्तीमुळे गंभीर अनेकदा वाद्याच्या भोवऱ्यात


गौतम गंभीर त्याच्या प्राणपणाने लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा वाद्याच्या भोवऱ्यात अडकलाय. 2023 मध्ये गौतम गंभीर आणि भारताचा माजी गोलंदाज श्रीसंत यांच्यामध्ये वाद झाला होता. दोघांमध्ये शा‍ब्दिक चकमकही पाहायला मिळाली होती. दरम्यान, गंभीरचा आजवर कोणाकोणाशी आणि कधी वाद झालाय पाहूयात... 


शाहिद आफ्रिदीला भिडला 


भारत आणि पाकिस्तान दरम्यान 2007 मध्ये एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कानपूरमध्ये गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात वाद झाला होता. झाले की असे की गंभीर फलंदाजी करत असताना शाहिद आफ्रिदी गोलंदाजी करण्यास आला. आफ्रिदीच्या चेंडूवर गंभीरने जबरदस्त चौकार लगावला आणि यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ झाली. पुढे धावा घेताना गंभीर आणि आफ्रिदी दोघेही एकमेकांना भिडले.  शेवटी दोघांनाही थांबवण्यासाठी अंपायरला हस्तक्षेप करावा लागला होता. 


कामरान अकमलवर धावून गेला


आशिया चषक 2010 चे सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना महत्त्वपूर्ण होता. श्रीलंकेत झालेल्या सामन्यादरम्यान गंभीर पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडूवर मैदानावरच संतापला होता. वास्तविक, गंभीरला बाद करण्याबाबत पाकिस्तानकडून अपील करण्यात आली होती. त्यानंतर   गंभीरचा कामरान अकमलसोबत वाद झाला. गौतम गंभीर कमरान अकमलच्या अंगावर धाऊन गेला होता. 


विराट कोहलीलाही सातत्याने भिडला 


भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीसोबतही गंभीरचे सातत्याने वाद झाले आहेत. दोघेही आयपीएलमध्ये दोनदा आमनेसामने आले आहेत. याआधी 2013 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असताना गंभीर आणि कोहली एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. यानंतर, 2023 मध्ये, जेव्हा गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार होता, तेव्हा दोघेही सामन्यानंतर एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. दोन्हीवेळेस दोघांमध्ये टोकाचा वाद झाला होता. 






इतर महत्त्वाच्या बातम्या 


Gautam Gambhir : मोठी बातमी, गौतम गंभीर याची भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड, जय शाह यांच्याकडून अधिकृत घोषणा