Legends League Cricket Match Date : क्रिकेट जगतातील माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. लेजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) या स्पर्धेचा दुसरा हंगाम खेळण्यासाठी हे खेळाडू मैदानात उतरणार आहेत. यंदा स्पर्धेचा दुसरा हंगाम असून पुन्हा एकदा जगभरातील माजी दिग्गज खेळाडू एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहे. 16 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेची अंतिम सामना 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डनमध्ये पहिला सामना खेळवल्यानंतर लखनौ, दिल्ली, कटक आणि जोधपुर या ठिकाणी देखील सामने खेळवले जातील. लीगच्या आयोजकांनी याबाबतची माहिती दिली आहे.  


लेजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामातील पहिलाच सामना अगदी स्पेशल होणार आहे. हा सामना भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याने त्यानिमित्तच खेळवला जात आहे. हा सामना 16 सप्टेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डनमध्ये इंडिया महाराजा विरुद्ध वर्ल्ड जाएंट्स (India Maharajas vs World Giants) यांच्यात खेळवला जाणार आहे. यावेळी भारतीय संघ अर्थात इंडिया महाराजा संघाची धुरा सौरव गांगुलीकडे (Sourav Ganguly) असणार आहे. तर जगातील अव्वल माजी खेळाडूंच्या वर्ल्ड जायंट्स संघाची धुरा इयॉन मॉर्गनकडे असणार आहे. सौरव गांगुली दिर्घकाळानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार आहे. लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये वर्ल्ड टीमकडून 10 देशातील खेळाडू सहभागी होणार आहे. ज्यात इंग्लंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या समावेश आहे.    


इंडिया महाराजा संघ:
सौरव गांगुली (कर्णधार), वीरेंद्र सहवाग, मोहम्मद कैफ, यूसुफ पठान, एस बद्रीनाथ, इरफान पठान, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंत, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक डिंडा, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंह, जोगिंदर शर्मा.


वर्ल्ड जायंट्स:
इयॉन मॉर्गन (कर्णधार), लेन्डले सिमन्स, जॅक कालिस, शेन वॉटसन, मॅट प्रायर, नाथन मैक्क्युलम, जोंटी रोड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकदजा, डॅनियल व्हेटोरी, मशरफे मुर्तजा, असगर अफगान, मिचेल जॉनसन, ब्रेट ली, केविन ओब्रायन, दिनेश रामदीन. 


हे देखील वाचा-