India Tour Of Zimbabwe: झिब्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय संघानं (ZIM vs IND) निर्भेळ यश संपादन केलं. या मालिकेत भारतानं 3-0 असा विजय मिळवत झिम्बाब्वेच्या संघाला क्लीन स्वीप दिलं.  एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखरेच्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर 290 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताच्या विजयात शुभमन गिल (Shubman Gill) आणि ईशान किशननं (Ishan Kishan) महत्वाची कामगिरी बजावली. या सामन्यात शुभमन गिलनं 130 आणि ईशान किशननं 50 धावांची खेळी केलीय. दरम्यान, भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा फलंदाज सिंकदर रझानं एकाकी झुंज दिली. त्यानं 95 चेंडूत 115 धावांची खेळी केली. परंतु, झिम्बाब्वेच्या संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. झिम्बाब्वेच्या संघाला 15 धावांची आवश्यकता असताना तो बाद झाला. परंतु, या सामन्यात शतक झळकावून सिंकदर रझानं सर्वांच लध वेधलं. तसेच भारताचा माजी क्रिकेटपटून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशी बरोबरी साधलीय. 


भारतानं दिलेल्या 290 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 276 धावांवर गारद झाला. झिम्बाब्बेकडून सिंकदर रझानं एकाकी झुंज देऊन 115 धावांचं योगदान दिलं. ज्यात नऊ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. सिकंदर रझानंतर झिम्बाब्वेच्या सीन विलियम्सनं 46 चेंडूत 45 धावांची खेळी केली. तर, ब्रॅड इवांसनं 28 धावा केल्या. मात्र, अखेरच्या काही षटकांत झिम्बाब्वेची फलंदाजी ढासळली आणि भारतानं हा सामना 13 धावांनी जिंकला. 


सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी
झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू सिकंदर रझानं ऑगस्ट 2022 मध्ये तीन अर्धशतक ठोकले आहेत. यापूर्वी त्यानं बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेत धावांचा पाठलाग दोन शतकं झळकावली होती. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधलीय. सचिन तेंडुलकरनं 1998 मध्ये धावांचा पाठलाग करताना 3 शतकं झळकावली होती.


भारताचा अखेरच्या एकदिवसीय सामन्यात 13 धावांनी विजय
भारताचा सलामीवीर शुभमन गिलच्या 130 धावांच्या जोरावर भारतानं प्रथम फलंदाजी करताना 289 धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या संघातील सुरुवात चांगली झाली नाही. पण झिम्बाब्वेच्या सिकंदरनं शतक झळकावत भारताला चांगलेच वेठीस आणलं होतं. झिम्बाब्वेला 15 धावांची गरज असताना सिकंदर 115 धावांवर बाद झाला आणि सामना भारताच्या बाजूनं झुकला. या सामन्यातील विजयासह भारतानं ही मालिका 3-0 अशी जिंकली.


हे देखील वाचा-