(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli On Cristiano Ronaldo: 'तू चाहत्यांसाठी जे काही केलं...' विराटची रोनाल्डोसाठी स्पेशल पोस्ट
Virat Kohli On Cristiano Ronaldo: फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालला मोरोक्कोकडून (Portugal vs morocco) पराभव पत्कारावा लागला.
Virat Kohli On Cristiano Ronaldo: फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालला मोरोक्कोकडून (Portugal vs morocco) पराभव पत्कारावा लागला. या पराभवासह पोर्तुगालचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. या पराभवाबरोबरच आता ख्रिस्तियानो रोनाल्डो कधीच विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होणार नाही की काय अशी शंका त्याच्या चाहत्यांना वाटू लागलीय. यादरम्यान, भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी (Cristiano Ronaldo) सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट केलीय.
फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोर्तुगालला मोरोक्कोविरुद्ध 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पोर्तुगालचा विश्वचषक 2022 मधील प्रवास संपला. मोरोक्कोविरुद्धच्या पराभवानंतर क्रिस्तियानो रोनाल्डो खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तो मैदानावर रडताना दिसला. हा रोनाल्डोचा शेवटचा विश्वचषक होता. पण तो आपल्या देशासाठी विजेतेपद मिळवू शकला नाही. रोनाल्डोचे फुटबॉलमधील योगदान सर्वांनाच आठवत आहे. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं रोनाल्डोचं कौतुक केलंय.
विराट कोहलीची इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
विराट कोहली काय म्हणाला?
"या खेळासाठी आणि खेळावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी तू जे काही केलं, ते कोणताही चषक किंवा जेतेपद न मिळवण्यापेक्षा फार मोठं आहे. हे कोणीही तुझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. तुझा लोकांवर पडलेला प्रभाव तुझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुला खेळताना पाहून मला आणि माझ्यासारख्या जगभरातील चाहत्यांना जे काही वाटतं ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ही देवाची देणगी आहे", असं विराट कोहलीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय.
सर्वाधिक गोल करणारा खेळाडू
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पोर्तुगालमधीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक 118 गोल केले आहेत. सध्या जगातील कोणताही खेळाडू त्याच्या या विक्रमाच्या आसपास नाही. रोनाल्डोनं पोर्तुगाल फुटबॉल संघासाठी 196 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, पोर्तुगालच्या संघाला अद्याप एकदाही फुटबॉल विश्वचषकावर नाव कोरता आलं नाही. यंदाचं विश्वचषक जिंकून ख्रिस्तियानो रोनाल्डोला खास निरोप देण्याचा पोर्तुगालच्या संघाचा प्रयत्न होता. परंतु, मोरोक्कोच्या संघानं पोर्तुगालच्या स्वप्नांवर पाणी फेरलं.
हे देखील वाचा-