Kylian mbappe : फायनलमध्ये फ्रान्स पराभूत होताच नेटकऱ्यांना आठवला विराट! एम्बाप्पे-कोहलीमध्ये खास 'किस्मत कनेक्शन'
Virat Kohli and Kylian Mbappe : फिफा विश्वचषकातील पराभवानंतर चाहत्यांनी फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एम्बाप्पेचं विराट कोहलीसोबत खास किस्मत कनेक्शन दाखवून देत काही भन्नाट मीम्स शेअर केले आहेत.
![Kylian mbappe : फायनलमध्ये फ्रान्स पराभूत होताच नेटकऱ्यांना आठवला विराट! एम्बाप्पे-कोहलीमध्ये खास 'किस्मत कनेक्शन' Fans found special connection in Kylian mbappe and virat kohli both played very well but team did not won world cup Kylian mbappe : फायनलमध्ये फ्रान्स पराभूत होताच नेटकऱ्यांना आठवला विराट! एम्बाप्पे-कोहलीमध्ये खास 'किस्मत कनेक्शन'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/19/29a9605c2d1b3eb040176dbfaf4b22411671451460513323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Virat Kohli and Kylian Mbappe Connection : फिफा विश्वचषक 2022 च्या (Fifa World Cup 2022) अंतिम सामन्यात फ्रान्सला अर्जेंटिनाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. ज्यामुळे एका अत्यंत रोमहर्षक सामन्यात फ्रान्सचा पराभव झाला आणि त्याचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं स्वप्न भंगलं... पण फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एम्बाप्पेने सामन्यात एकहाती झुंज देत सर्वांचीच मनं जिंकली, त्यानं स्पर्धेतही सर्वाधिक गोल केले आणि गोल्डन बूट जिंकला.. त्यामुळं सर्वोत्तम खेळ करुनही एम्बाप्पे वर्ल्ड कप जिंकू न शकल्याने नेटकऱ्यांना विराट आठवला आणि दोघांमधील खास किस्मत कनेक्शन मीम्सच्या माध्यमातून नेटीजन्सनी समोर आणलं...
ज्याप्रमाणे एम्बाप्पे याने संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ दाखवत गोल्डन बूट पटकावला, तशी कामगिरी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 2014 आणि 2016 टी-20 वर्ल्डकपमध्ये केली होती. दोन्ही वेळी 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा किताब त्यानं पटकावला होता, पण तेव्हाही भारतीय संघाला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं. ज्यामुळे फ्रान्सच्या पराभवानंतर लोकांनी विराट कोहली आणि एम्बाप्पे यांच्यातील नशीबातं खास कनेक्शन मीम्समधून समोर आणलं. चाहत्यांनी कोहली आणि एम्बाप्पेची बऱ्याच गोष्टींमध्ये तुलना केली, याच संबधित काही खास मीम्स पाहू....
Only Virat Kohli and Mbapee fans can relate
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) December 19, 2022
Feel for this two guys!!! 😢😢#ViratKohli𓃵 | #LionelMessi𓃵 | #Mbappe | #FIFAWorldCup pic.twitter.com/sUZG6p3B7c
#KylianMbappe
— وسیم 💫 (@syed_vaseem) December 19, 2022
What a legend
At 79 minute ARG 2 FRA 0
At 80 minute ARG 2 FRA 1
At 81 minute ARG 2 FRA 2
Then further, when ARG takes the lead, again another equaliser to make it 3-3
Done a Virat Kohli 18.5 and 18.6#FIFAWorldCup#ArgentinaVsFrance #Mbappe
#WorldCupFinal19.5 and 19.6 Sixes from Virat Kohli.
— Tony (@five_wides) December 18, 2022
80' and 81' Goals from Mbappe.
The erupted moments of sports in 2022.#Mbappe #FIFAWorldCup pic.twitter.com/GC5hYVShG6
#Mbappe Did 18.5 and 18.6 of @imVkohli 🔥
— Gaurav AnilRao Dalvi 🇮🇳👑 (@GauravRoyal55) December 18, 2022
In Just 97sec @KMbappe Changed Game For #France
New Generation #GOAT𓃵 ❤️#Mbappe𓃵 #Mbappegoal #ArgentinaVsFrance #WorldcupQatar2022 #FIFAWorldCupFinal #GoalOfTheDay #GoldenBoot #Hattrick pic.twitter.com/iGeKtusqiH
MBappe ka penalty is like @imVkohli ka wo no ball... and both scored well. 🔥 pic.twitter.com/aaJlh1Maki
— Rudramani Pandey (@Rudanboss) December 18, 2022
Mbappe did goal at 80 and 81 just like 18.5 and 18.6 of virats inning #Messi𓃵 #Mbappe #FIFAWorldCup #WorldCupFinal #ArgentinaVsFrance #ViratKohli #IndianCricketTeam pic.twitter.com/GoOrsGg2gc
— Mangesh Patole (@MangeshPatole14) December 19, 2022
एम्बाप्पेची दमदार हॅट्रिक
विशेष म्हणजे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कायलिन एम्बाप्पे यानं सलग तीन गोल करत दमदार अशी हॅट्रिक केली. ज्यामुळे फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये 1966 नंतर पहिल्यांदाच हॅट्रिकची नोंद झाली. कायलिनच्या या कामगिरीनंतर यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल त्याच्याच नावावर झाले. ज्यामुळं 8 गोल्स स्पर्धेत करत तो गोल्डन बूटचा मानकरी ठरला. त्यानं मेस्सीला (7 गोल) मात दिली.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)