ESPNcricinfo awards : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) मागील काही वर्षात केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे तो सध्या भारतीय संघाचा तिन्ही प्रकारातील पूर्ण वेळ यष्टीरक्षक झाला आहे. पण कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी आणखी खास आहे. त्यामुळे त्याला ईएसपीएनक्रिकइन्फो पुरस्कारांमध्ये (ESPNcricinfo awards) कसोटी फलंदाज (Test Batsman) म्हणून पुरस्कृत करण्यात आलं आहे. तर 'कॅप्टन ऑफ द इयर' म्हणून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्य़मसनचा सन्मान करण्यात आला आहे.


क्रिकेट प्रकारातील सर्वात जुना प्रकार म्हणजे कसोटी क्रिकेट. पण अलीकडे टी20 क्रिकेटमुळे काहीशी लोकप्रियता कमी झालेल्या कसोटी क्रिकेटला पुन्हा एकदा भारतीयांच्या मनात जागा निर्माण करुन दिली, ती म्हणजे भारताच्या 2020-21 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याने. भारताने पहिला सामना अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने गमावल्यानंतर दुसरा आणि चौथा सामना भारताने जिंकला. तर तिसरा सामना अनिर्णीत सोडण्यात भारताला यश आलं. ज्यामुळे भारताने हा ऐतिहासिक विजय मिळवला. दरम्यान यावेळी तिसरा सामना अनिर्णीत करण्यात आणि चौथा सामना जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला ऋषभ पंत याने. त्यानंतरही काही कसोटी सामन्यात अप्रतिम खेळी पंतने दाखवल्या. त्याच्या या सगळ्या कामगिरीमुळेच त्याला ईएसपीएनक्रिकइन्फोकडून कसोटी फलंदाज पुरस्कारांने गौरवण्यात आलं आहे.


इतर पुरस्कार


पंत आणि केनशिवाय इतरही पुरस्कारांनी काही क्रिकेटपटूंना यावेळी सन्मानित करण्यात आलं. यावेळी कसोटी गोलंदाज म्हणून न्यूझीलंडच्या काईल जेमिसनचा सन्मान करण्यात आला. त्याने WTC मध्ये भारताविरुद्ध 31 धावा देत 5 विकेट टीपलेल्या कामगिरीचा सन्मान करण्यात आला. तर एकदिवसीय फलंदाज म्हणून पाकिस्तानच्या फखर जमानला आणि एकदिवसीय गोलंदाज म्हणून इंग्लंडच्या साकिब महमूदला नावाजण्यात आलं. टी20 फलंदाज म्हणून जोस बटलर, टी20 गोलंदाज म्हणून शाहीन आफ्रीदी यांना सन्मानित करण्यात आलं. तर महिला फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनी आणि गोलंदाज म्हणून इंग्लंडच्या केट क्रॉसला सन्मानीत करण्यात आलं.  


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha