IND vs WI, 1 Innings Highlight:  अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 266 धावांचं लक्ष्य ठेवलंय. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघ डगमगताना दिसला. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं 50 षटकात 9 विकेट्स गमावून 265 धावा केल्या आहेत. या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं उत्कृष्ट गोलंदाजी करून दाखवलीय.


नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, भारताची सुरुवात खराब झाली. भारतानं पाच षटकाच्या आत दोन विकेट्स् गमावल्या. कर्णधार रोहित शर्मा (13 धावा, 15 बॉल) आणि विराट कोहली शून्यावर बाद झाला. त्यानंतर शिखर धवनंही 10 व्या षटकात ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मात्र, त्यानंतर मैदानात आलेले श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतनं संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये 110 धावांची भागीदारी झाली. परंतु, 29 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रिषभ पंत झेलबाद झाला. या सामन्यातही सुर्यकुमार यादवनं (7 चेंडू 6 धावा) निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला घेऊन श्रेयस अय्यरनं संघाचा डाव पुढे चालवला. पण, फॅबियन अॅलेनच्या गोलंदाजीवर श्रेयसनं त्याची विकेट्स गमावली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (33 धावा) आणि दिपक चहर 38 धावा करून बाद झाला. कुलदीप यादव 5 आणि मोहम्मद सिराजनं 4 धावा केल्या. ज्यामुळं भारतानं 50 षटकात 265 धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून जेसन होल्डरनं 4 विकेट्स घेतल्या. तर, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, फॅबियन वॉल्श आणि ओडियन अॅलेन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली. 


संघ-


भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.


वेस्ट इंडीज: शाई होप (यष्टीरक्षक), ब्रॅंडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, फॅबियन ऍलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, केमार रोच.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha