IPL Auction 2022 : मागील अनेक वर्ष भारतीय क्रिकेट फिरकीपटूंवरच अवलंबून असायचं, पण मागील काही वर्षात भारताने दमदार वेगवान गोलंदाजांना संघात घेतलं आहे. त्यात आता आगामी आयपीएल 2022 (IPl 2022) स्पर्धेतही अनेक वेगवान गोलंदाजांना विविध संघ करारबद्ध करण्यासाठी उत्सुक आहे. उद्या अर्थात 12 आणि 13 फेब्रुवारी अशा दोन दिवस हा महालिलाव पार पडणा आहे. त्यात यंदा आयपीएलमध्ये आठ जागी 10 संघ खेळणार असल्याने या महालिलावात आणखी चुरस दिसून येणार आहे. नव्या आलेल्या संघासह जुन्या संघानी आपआपले तीन ते चार खेळाडू रिटेन केले असून आता इतर संघ पूर्ण करण्यासाठी महालिलाव पार पडणार आहे. तर यावेळी नेमकं कोणत्या आठ भारतीय वेगवान गोलंदाजांवर संघाचं लक्ष असेल यावर एक नजर फिरवूया...



  1. मोहम्मद शमी : भारतीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला सर्वात अनुभवी गोलंदाजांमधील एक नाव म्हणजे मोहम्मद शमी. मागील सीजन पंजाबमध्ये असणाऱ्या शमीला यंदा पंजाब पुन्हा संघात घेतं का हे पाहावं लागेल.

  2. भुवनेश्वर कुमार : शमी पाठोपाठ आणखी एक अनुभवी भारतीय गोलंदाज म्हणजे भुवनेश्वर कुमार. स्वींग किंग भुवनेश्वर कुमार मागी काही काळापासून फॉर्ममध्ये नसला तरी त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.

  3. आवेश खान : भारताच्या वेगवान गोलंदाजांची फौज म्हटलं की त्यातील एक दमदार नाव म्हणजे आवेश खान. दिल्लीकडून खेळणाऱ्या आवेशला संघ रिटेन करु शकला नाही. पण महालिलावात करारबद्ध नक्कीच करेल अशी आशा आहे.

  4. टी नटराजन : यॉर्कर टाकण्यात तरबेज असणारा नटराजन कोरोनाची बाधा झाल्यामुळे मागील आयपीएल गाजवू शकला नाही. पण यंदा त्याला कोणता संघ करारबद्ध करतो आणि तो कशी कामगिरी करतो याकडे अनेकांची नजर आहे. 

  5. हर्षल पटेल : आयपीएल 2021 मध्ये पर्पल कॅप विजेता हर्षलवर यंदा तगडी बोली नक्कीच लागू शकते.

  6. प्रसिध  कृष्णा : नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यात अफलातून कामगिरी करणारा प्रसिध पुन्हा केकेआरमध्ये जाणार की दुसरा कोणता संघ त्याला करारबद्ध करणार हे पाहावे लागेल.

  7. शिवम मावी : केकेआरचा आणखी एक खेळाडू म्हणजे शिवम मावी. शिवमला मागील आयपीएलमध्ये एका षटकात पृथ्वीने 6 चौकार ठोकले खरे पण तरी यंदा तो पुन्हा जलवा दाखवतो का? हे पाहावे लागेल.

  8. कमलेश नागरकोटी : केकेआरचा तिसरा वेगवान गोलंदाज म्हणजे कमलेश नागरकोटी. त्याल कोणता संघ विकत घेतो हे पाहावे लागेल.


कोणत्या फ्रँचाईझीच्या ताफ्यात कोणते शिलेदार? फ्रँचाईझींच्या बटव्यात किती रक्कम आणि किती खेळाडूंची गरज


चेन्नई सुपर किंग्स
बिनीचे शिलेदार – रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7


दिल्ली कॅपिटल्स
बिनीचे शिलेदार– रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी) आणि एनरिच नॉकिया (6.5 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 47.5 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7


कोलकाता नाईट रायडर्स
बिनीचे शिलेदार– आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 6


लखनौ सुपर जायंटस
बिनीचे शिलेदार– लोकेश राहुल (17 कोटी), मार्कस स्टॉईनिस (9.2 कोटी), रवी बिष्णोई (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 59 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7             


मुंबई इंडियन्स
बिनीचे शिलेदार– रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमरा (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7


पंजाब किंग्स
बिनीचे शिलेदार– मयांक अगरवाल (12 कोटी), अर्शदीपसिंग (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 72 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 23, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 8


राजस्थान रॉयल्स
बिनीचे शिलेदार– संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी) यशस्वी जैस्वाल (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 62 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
बिनीचे शिलेदार– विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 57 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7


सनरायझर्स हैदराबाद
बिनीचे शिलेदार– केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 68 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7


गुजरात टायटन्स
बिनीचे शिलेदार– हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (आठ कोटी)
बटव्यातली शिल्लक – 52 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha