IND Vs WI: भारत आणि वेस्ट इंडीज (India Vs West Indies) यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळला जात आहे. या मालिकेतील दोन सामने जिंकल्यानंतर भारताच्या नजरा क्लीन स्वीपवर आहे. या सामन्यात भारतीय संघ चार बदल करून मैदानात उतरलाय. भारताचा सलामीवीर शिखर धवनसह चार खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आलाय. तर, कोणकोणत्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय? याबाबात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळली जात आहे. पहिल्या दोन सामन्यात भारतानं विजय मिळवून मालिकेवर कब्जा केलाय. दरम्यान, तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघानं चार बदल केले आहेत. भारतीय संघानं केएल राहुल, दिपक हुड्डा, शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती दिलीय. तर, त्यांच्याऐवजी शिखर धवन, श्रेयस अय्यर, दिपक चहर आणि कुलदीप यादवचा संघात समावेश केलाय.
बीसीसीआयचं ट्वीट-
संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.
वेस्ट इंडीज: शाई होप (यष्टीरक्षक), ब्रॅंडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, फॅबियन ऍलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, केमार रोच.
- IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना; इतिहास घडवण्याची टीम इंडियाला संधी
- IND vs WI 3rd ODI : रोहित-धवन करणार ओपनिंग, तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला अशी असेल Playing 11
- Ajinkya Rahane : 'माझ्या ऑस्ट्रेलियातील कामगिरीचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं', अजिंक्य रहाणेनं व्यक्त केली खंत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha