IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्ध अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्डेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय मालिकेत भारतानं 44 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतानं तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेवर कब्जा केलाय. तसेच भारतानं वेस्ट इंडीजविरुद्ध सलग 11 एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. एका संघाविरोधात सर्वाधिक विजय मिळवून भारतानं पाकिस्तानशी बरोबरी केलीय.
एका संघाविरोधात सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्तानच्या संघानं झिम्बाब्वेविरुद्ध सलग 11 एकदिवसीय मालिकेत विजय मिळवलाय. 1996 ते 2021 पर्यंत म्हणजेच 26 वर्षे झिम्बाब्वेचा संघ पाकिस्तानला मालिकेत हरवू शकलेला नाही. पाकिस्तान संघाला भविष्यात हा विक्रम आणखी मोठा करण्याची संधी आहे.
भारताविरुद्ध वेस्टइंडीजचं खराब प्रदर्शन
भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. वेस्ट इंडीजला भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या सलग 11 एकदिवसीय मालिका गमवाव्या लागल्या आहेत. 2007 पासून वेस्ट इंडीजला भारताविरुद्ध एकही मालिका जिंकता आली नाही. वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला अखेर 2006 मध्ये त्यांच्या मायदेशात 4-1 नं पराभूत केलं होतं.
एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिकेचा जिंकण्याचा विक्रम
एका संघात सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा पाकिस्तान आहे. पाकिस्ताननं 1999 के 2017 पर्यंत वेस्ट इंडीजच्या संघाला सलग 9 मालिकेत धूळ चाखली आहे. चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे नाव आहे. दक्षिण आफ्रिकेनं झिम्बाब्वेविरुद्ध 1995-2018 दरम्यान सलग 9 एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारतीय संघाचे नाव पुन्हा पाचव्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने 2007 ते 2021 दरम्यान सलग 9 वनडे मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला आहे.
हे देखील वाचा-
- आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या पॅरा बॅडमिंटनपटूची उपेक्षा; नांदेडच्या खेळाडूला आर्थिक मदतीची गरज
- आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या पॅरा बॅडमिंटनपटूची उपेक्षा; नांदेडच्या खेळाडूला आर्थिक मदतीची गरज
- IND Vs WI, 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 44 धावांनी विजयी, मालिकेतही विजयी आघाडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha