दोन महिला क्रिकेटपटूंनी दिली गूड न्यूज, लेस्बियन पार्टनरसोबत लग्न अन् आता प्रेग्नेंसीची घोषणा
Katherine Brunt-Natalie Sciver: क्रिकेटविश्वातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
Katherine Brunt-Natalie Sciver: 5 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर इंग्लंड महिला क्रिकेटर नताली स्किवर (Natalie Sciver) आणि कॅथरीन ब्रंट (Katherine Brunt) यांनी लग्न केल्यानंतर क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली होती. नताली स्किवर आणि कॅथरीन ब्रंट यांनी 2019 मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. याचदरम्यान आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
नताली स्किवरने (Natalie Sciver) सोशल मीडियाद्वारे एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. या पोस्टद्वारे नताली स्किवरने कॅथरीन ब्रंट (Katherine Brunt) गर्भवती असल्याचं सांगितले. तसेच नतालीने सोनोग्राफी टेस्टच्या रिपोर्टचे फोटोही शेअर केले आहेत.
नेटकऱ्यांना पडला प्रश्न-
कॅथरीन ब्रंट आई होणार असल्याच्या वृत्तावर सोशल मीडियावर मोठ्या कमेंट्सचा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. नताली स्किवर आणि कॅथरीन ब्रंट यांच्या समलिंगी विवाहानंतर त्यांना मुलं कशी होऊ शकतात, अशी प्रश्न उपस्थित केले जात आहे. आयव्हीएफसह काही तंत्रे आहेत, ज्याद्वारे कोणतीही महिला मुलाला जन्म देऊ शकते. साधारणपणे फक्त लेस्बियन जोडपे किंवा सिंगल मदर होऊ इच्छिणाऱ्या महिलाच याचा अवलंब करतात. अशा परिस्थितीत, नताली आणि ब्रंट, एकच लिंग असल्याने, मूल होण्याचा आनंद मिळविण्यासाठी कदाचित हीच पद्धत वापरल्याचे बोलले जात आहे. नताली आणि कॅथरीन या दोघीही इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये या दोघींचा साखरपुडा झाला होता. नताली स्किवर आणि कॅथरीन ब्रंट ही क्रिकेट जगतातील पहिली समलिंगी जोडी नाही. यापूर्वीही न्यूझीलंडच्या एमी सॅटरथवेट आणि ली ताहुहू, तसेच दक्षिण आफ्रिकेच्या मारिजने कप आणि डेन व्हॅन निकेर्क यांनी लग्न केली आहेत.
कॅथरीन ब्रंटची कारकीर्द-
कॅथरीन ब्रंटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. कॅथरीन ब्रंट ही अष्टपैलू खेळाडू आहे. तिने 14 कसोटी सामन्यात 51 विकेट्स घेतल्या आहेत. तर कॅथरीनने 140 एकदिवसीय सामन्यात 167 विकेट्स घेतल्या आहेत. तर 96 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिने 98 विकेट्स पटकावल्या आहेत.
नताली स्किवरची कारकीर्द-
नताली स्किवर देखील इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू आहे. नताली स्किवरने 7 कसोटी सामन्यांमध्ये तीनशेहून अधिक धावा केल्या आहेत. तसेच 9 विकेट्स घेतल्या. तर 89 एकदिवसीय सामन्यांमध्ये नताली स्किवरने 2711 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय फॉरमॅटमध्ये नतालीने एकुण 72 विकेट्सही पटकावल्या आहेत.
संबंधित बातमी:
बाद नव्हता, तरीही कोहलीने DRS घेतला नाही; मैदान सोडताच रोहित शर्मा अन् अम्पायरच्या रिॲक्शनची चर्चा