ENG vs ZIM : टीम इंडियाची घोषणा होताच, पाकिस्तानी वंशाच्या इंग्लंडच्या खेळाडूची धडकी भरवणारी कामगिरी; सातासमुद्रापार नेमकं काय घडलं?
20 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी पाकिस्तानी वंशाच्या इंग्लंडच्या खेळाडूने धडकी भरवणारी कामगिरी केली आहे.

ENG vs ZIM, One-Off Test : 20 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी पाकिस्तानी वंशाच्या इंग्लंडच्या खेळाडूने धडकी भरवणारी कामगिरी केली आहे. शनिवारी 24 मे रोजी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची निवड करण्यात आली, आणि त्याच दिवशी सातासमुद्रापार इंग्लिश संघाने एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव केला. हा कसोटी सामना अवघ्या अडीच दिवसात संपला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली 6 बाद 565 धावांवर आपला डाव घोषित केला. यानंतर, झिम्बाब्वे संघ पहिल्या डावात 265 आणि दुसऱ्या डावात 255 धावांवर बाद झाला.
इंग्लंडचा एक डाव अन् 45 धावांनी दणदणीत विजय
नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या गेलेल्या 4 दिवसांच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडने झिम्बाब्वेविरुद्ध एक डाव आणि 45 धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना, इंग्लंडने झॅक क्रॉली (124), बेन डकेट (140) आणि ऑली पोप (171) यांच्या शतकांच्या जोरावर 6 बाद 565 धावांवर आपला डाव घोषित केला. या तीन फलंदाजांव्यतिरिक्त हॅरी ब्रूकने 58 धावांची अर्धशतकी खेळी खेळली.
Shoaib Bashir grabs his best Test figures as England seal a dominant win against Zimbabwe 🔥#ENGvZIM 📝: https://t.co/ViZB107lxh pic.twitter.com/ezwvJAOuZT
— ICC (@ICC) May 24, 2025
झिम्बाब्वेचा पहिला डाव 265 धावांवर संपुष्टात आला आणि त्यांना फॉलोऑन करावा लागला. पाहुण्या संघाकडून सलामीवीर ब्रेन बेनेटने 139 धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. अॅटकिन्सन आणि स्टोक्सने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
फॉलोऑननंतर पुन्हा फलंदाजीसाठी उतरलेला पाहुणा संघ सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात फक्त 255 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंडकडून शोएब बशीरने 6 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशाप्रकारे, त्याने या सामन्यात 143 धावा खर्च करून एकूण 9 विकेट्स घेतल्या.
बशीरची धडकी भरवणारी कामगिरी...
पाहुण्या संघाचा दुसरा डाव गुंडाळण्यात शोएब बशीरने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 6 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शोएबच्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. कसोटी डावात त्याने 4 बळी घेण्याची ही चौथी वेळ आहे. बशीर 22 वर्षांखालील सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारा इंग्लिश गोलंदाजही बनला आहे. स्टीव्हन फिनने हे तीन वेळा केले आहे.
6️⃣ WICKETS for Shoaib Bashir 😱
— England Cricket (@englandcricket) May 24, 2025
😱 Jaw-dropping catches
🎉 England's first win of the summer
Full Day Two Highlights 👇https://t.co/5L2dJi3SQS pic.twitter.com/naIf4dvunM
या सामन्यात शोएब बशीरने एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत. कोणत्याही एका कसोटीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या सामन्यादरम्यान, तो कसोटीत 50 बळी घेणारा इंग्लंडचा सर्वात तरुण गोलंदाजही बनला. गेल्या वर्षी भारत दौऱ्यात बशीरने टीम इंडियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
हे ही वाचा -





















