James Anderson: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना नॉटिंगहॅम येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ॲंडरसननं आणखी एक पराक्रम करून दाखवलाय. नॉटिंगहॅम कसोटीच्या चौथ्या दिवशी  टॉम लॅथमला बाद करून ॲंडरसननं कसोटी क्रिकेटमधील 650 विकेट्सचा टप्पा पूर्ण केलाय. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरलाय. याशिवाय त्यानं आणखी एक खास विक्रमाला गवसणी घातलीय. वयाचे 30 वर्षे ओलांडल्यानंतर 100 कसोटी सामने खेळणारा ॲंडरसन जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरलाय. 

ॲंडरसनचा खास विक्रम
इंग्लंडचा माजी यष्टिरक्षक ॲलेक स्टीवर्टनं वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतर सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. तर अँडरसनचा हा 100वा कसोटी सामना होता. त्याचबरोबर या यादीत सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे 95-95 कसोटी सामन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ 92 कसोटी सामन्यासह चौथ्या क्रमांकावर आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स-

 क्रमांक गोलंदाज विकेट्स
1 मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) 800
2 शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) 708
3 जेम्स अँडरसन (इंग्लंड) 650*
4 अनिल कुंबळे (भारत) 619
5 ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) 563

ॲलेक स्टुअर्टला मागं टाकण्याची संधी
या यादीत ॲंडरसनचा समावेशही खास आहे कारण तो वेगवान गोलंदाज आहे. वयाच्या 39 व्या वर्षीही तो युवा वेगवान गोलंदाजांसाठी एक उदाहरण आहे. ॲंडरसन ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, त्यावरून असे दिसते आहे की तो पुढील किमान दोन-तीन वर्षे कसोटी क्रिकेट खेळत राहील. ॲंडरसनला आता ॲलेक स्टुअर्टला मागे टाकून या बाबतीत विश्वविक्रम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

हे देखील वाचा-