BCCI Increase Pension Of Former Cricketers: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) माजी भारतीय क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना पंचांच्या पेन्शनबाबत मोठा निर्णय घेतलाय.  बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारताचे माजी महिला आणि पुरुष क्रिकेटपटू आणि पंचांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार असल्याची माहिती दिली. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे 900 क्रिकेटपटूंचा फायदा होणार आहे. 


बीसीसीआय अध्यक्ष जय शाह काय म्हणाले?
नुकतंच जय शाह यांनी एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी असं म्हटलंय की, "माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना पंच यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यात आल्याची घोषणा करताना मला आनंद होतोय. तब्बल 900 क्रिकेटपटू आणि पंचांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यामुळं जवळपास 75 टक्के खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 100 टक्के वाढ होईल."


ट्वीट-



पेन्शनसाठी चार स्लॅबची निर्मिती
बीसीसीआयने पेन्शनसाठी चार स्लॅब बनवले आहेत. यापूर्वी ज्यांना 15 हजार रुपये पेन्शन मिळायची, त्यांच्या पेन्शनमध्ये 15 हजारांची वाढ करण्यात आलीय. म्हणजेच आता त्यांना एकूण 30 हजार मिळणार. तसंच ज्यांना 22 हजार 500 रुपये मिळायचे, त्यांना आता 45 हजार मिळणार आहे. 30 हजार पेन्शन असणाऱ्यांना आता 52 हजार 500 रुपये मिळतील आणि 37 हजार 500 रुपये मिळणाऱ्यांना 60,000 रुपये देण्यात येतील. 50 हजार पेन्शन मिळत असलेल्या खेळाडू आणि पंचांना 70 हजार रुपये मिळतील. महत्वाचं म्हणजे, 1 जून 2022 पासून नवी पेन्शन योजना लागू करण्यात येईल.


पेन्शन वाढवण्याबाबत सौरव गांगुली काय म्हणाले?
भारताचे माजी महिला आणि पुरुष क्रिकेटपटू आणि पंचांची पेन्शन वाढवण्याबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. "आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक स्थितीची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. खेळाडू जीवनरेखा राहतात आणि त्यांचे खेळाचे दिवस संपले की, त्यांना आर्थिक मदत करणं बीसीसीआयचं कर्तव्य आहे. पेन्शनमधील करण्यात आलेली वाढ त्यांच्यासाठी केलेली आर्थिक मदतीच्या दिशेनं एक पाऊल आहे. 


हे देखील वाचा-