IND vs SA: युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाचा स्टार स्पिनर आहे. मध्यंतरी खराब कामगिरीमुळं चहलही टीकाकारांच्या निशाण्यावर होता. पण नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकून चहल पुन्हा चर्चेत आलाय. दरम्यान, एका युट्युब चॅनलशी बोलताना युजवेंद्र चहनं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (M.S Dhoni) नम्र स्वभावावर भाष्य केलंय. 


चहलनं जून 2016 मध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. त्यांनंतर त्यानं इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला. त्यावेळी चहलनं धोनीला सर म्हटलं होतं. परंतु, त्यावेळी धोनीनं त्याला वाटेल ते बोल, पण सर बोलू नको असं सांगितलं. चहलनं युट्युब शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या क्रिकेट शोमध्ये बोलताना धोनीच्या नम्र स्वभावर भाष्य केलं. चहल म्हणाला की, "मला महान एमएस धोनीकडून एकदिवसीय कॅप मिळाली आहे. तो एक दिग्गज आहे आणि मी पहिल्यांदा त्याच्यासोबत खेळलो. मी त्याच्यासमोर बोलूही शकत नव्हतो. पण तो ज्या पद्धतीनं बोलतो, हे बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की खरचं हा धोनी आहे का?  जेव्हा मी त्याला पहिल्यांदा झिम्बाब्वेमध्ये भेटलो, तेव्हा मी त्याला माही सर म्हणायचो. नंतर त्यानं मला फोन केला आणि म्हणाला, माही, धोनी, महेंद्रसिंह धोनी किंवा तुला वाटेल ते बोल, पण सर नाही."


धोनीच्या नेतृत्वात चहलची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली युजवेंद्र चहलनं 46 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यात त्यानं 25.32 च्या सरासरीनं आणि 4.92 च्या इकॉनॉमीसह 81 विकेट्स घेतल्या आहेत. युजवेंद्र चहल हा टी-20 क्रिकेटमध्येही टीम इंडियाचा मुख्य फिरकी गोलंदाज आहे. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीला संघात स्थान देण्यात धोनीचा मोलाचा वाटा असल्याचं म्हटलं जातं.


चहलची आयपीएल 2022 मधील कामगिरी
नुकताच पार पडलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राजस्थानकडून खेळताना युजवेंद्र चहलनं दमदार कामगिरी करून पर्पल कॅप जिंकली. त्यानं 17 सामन्यात 19.51 च्या सरासरीनं 27 विकेट्स घेतले. 40/5 ही त्याची या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी होती. या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणार्‍यांच्या यादीत वानिंदू हसरंगा 26 विकेट्ससह दुसऱ्या आणि कागिसो रबाडा (23 विकेट) तिसऱ्या क्रमांकावर होता. तसेच यंदाच्या हंगामात हॅट्रिक घेणारा युजवेंद्र चहल एकमेव गोलंदाज आहे. 


हे देखील वाचा-