(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG vs IND 4th Test : 20 वर्षीय शोएब बशीरच्या फिरकीने टीम इंडियाला नाचवले, रांची कसोटीत भारत 134 धावांनी पिछाडीवर
ENG vs IND 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड (ENG vs IND) कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 353 धावा केल्या.
ENG vs IND 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड (ENG vs IND) कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 353 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या दिवसअखेर 7 विकेट्स गमावत 219 धावाच करता आल्या आहेत. इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीरच्या (Shoaib Bashir) फिरकीने भारतीय फलंदाजांना चांगलंच नाचवलय.
यशस्वी जैस्वालची एकाकी झुंज
पहिल्या डावात 353 धावा केल्यानंतर इंग्लंडचा संघ गोलंदाजीसाठी उतरला. त्यानंतर टीम इंडियाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शोएब बशीरने 4 विकेट्स पटकावत टीम इंडियाला धक्के दिले आहेत. त्यामुळे टीम इंडिया रांची कसोटीत 134 धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून यशस्वी जैस्वाल शिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. जैस्वालने 71 धावा करत टीम इंडियाकडून एकाकी झुंज दिली आहे. जैस्वाल शिवाय शुभमन गिलने 38 धावांचे योगदान दिले आहे. तर ध्रुव जुरेल 30 धावा करुन नाबाद क्रिजवर आहे.
भारताकडून, यशस्वी जैस्वाल 117 चेंडूमध्ये 73, शुभमल गिल 65 चेंडूमध्ये 38 धावा, रजत पाटीदार 42 चेंडूमध्ये 17 धावा आणि सरफराज खानने 53 चेंडूमध्ये 14 धावांचे योगदान दिले. शिवाय, रवींद्र जाडेजा 12 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा केवळ 2 धावा करत तंबूत परतला. टीम इंडियाकडून केवळ यशस्वी जैस्वालला चांगली कामगिरी करता आली. इंग्लंडकडून शोएब बशीरने 4, टॉम हर्टलीने 2 तर जेम्स अँडरसनने 1 विकेट पटकावली. भारताकडून ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव नाबाद आहेत.
Spinners make it England's day in Ranchi 👏#WTC25 | #INDvENG 📝: https://t.co/fB1LxN8E9c pic.twitter.com/4XPH1EwUPl
— ICC (@ICC) February 24, 2024
जो रुटची शतकी खेळी
पहिल्या दिवशी फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाकडून जो रुटने शतकी खेळी केली. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजीला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. इंग्लंडकडून, झॅक क्राऊली 42 चेंडूमध्ये 42, बेन डकेट 21 चेंडूमध्ये 11, जो रुट 226 चेंडूमध्ये 106 (नाबाद) , जॉनी बेयरस्टो 35 चेंडूमध्ये 38, बेन स्टोक्सने 126 चेंडूमध्ये 47 धावा आणि ओली रॉबीनसनने 60 चेंडूमध्ये (नाबाद) 31 धावांचे योगदान दिले आहे. इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर 7 विकेट्स गमावत 90 षटकात 302 धावा केल्या.
जो रुटने या सामन्यात 31 वे शतक पूर्ण केले. रुट 106 धावांवर आणि रॉबिनसर 31 धावा करत नाबाद आहेत. पहिला सेशन पूर्णपणे भारताच्या नावावर राहिला होता. सुरुवातीच्या सेशनमध्येच टीम इंडियाने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला होता. तर दुसऱ्या सेशनमध्ये इंग्लंडने वापसी केली. दुसऱ्या सेशनमध्ये इंग्लंडने 86 धावा कुटल्या. तर तिसरे सेशनमध्ये दोन्ही संघाने तुल्यबळ कामगिरी केली. भारताने 2 विकेट्स पटकावल्या. तर रुटने शतक पूर्ण केले.
इतर महत्वाच्या बातम्या