Eng vs Ind 4th Test Day 4 Stumps : चौथ्या दिवसाचा खेळ संपला! राहुल-गिल या जोडीने इंग्लंडची झोप उडवली, तरी टीम इंडिया137 धावांनी पिछाडीवर
Eng vs Ind 4th Test Day 4 Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे.
LIVE

Background
India vs England 4th Test Day 4 Live Score Latest Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंड खूपच पुढे आहे. पहिल्या डावात भारताला 358 धावांवर रोखल्यानंतर, इंग्लंडने आतापर्यंत 7 गडी गमावून 544 धावा केल्या आहेत. बेन स्टोक्स 77 धावांवर नाबाद आहे आणि लियाम डॉसन 21 धावांवर नाबाद आहे. इंग्लंड संघाने 186 धावांची आघाडी घेतली आहे.
जर टीम इंडियाला या सामन्यात पराभव टाळायचा असेल तर, फलंदाजांना पुढे येऊन जबाबदारी घ्यावी लागेल. आता भारताचा विजय मँचेस्टर कसोटी अनिर्णित ठेवण्यात आहे. यामुळे टीम इंडियाला मालिका गमावण्यापासून वाचवता येईल, पण, मालिका जिंकण्याचे त्यांचे स्वप्न येथेच संपेल. जर इंग्लंडने हा कसोटी सामना जिंकला तर तो मालिका जिंकेल, कारण इंग्लंड संघ मालिकेत आधीच 2-1 ने पुढे आहे.
मँचेस्टर कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर इंग्लंडने 7 गडी गमावून 544 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात इंग्लंडची एकूण आघाडी 186 धावांपर्यंत वाढली आहे, कारण भारतीय संघाचा पहिला डाव 358 धावांपर्यंत मर्यादित होता. जो रूटने इंग्लंडसाठी 150 धावांची खेळी खेळून अनेक विक्रम केले आहेत. तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे, राहुल द्रविड, जॅक कॅलिस आणि रिकी पॉन्टिंग यांना मागे टाकत. आता फक्त सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे आहे.
भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 28 षटकांत 95 धावांत एक बळी घेतला. अंशुल कंबोजने 18 षटकांत 89 धावांत एक बळी घेतला. मोहम्मद सिराजने 26 षटकांत 113 धावांत एक बळी घेतला. रवींद्र जडेजाने 33 षटकांत 117 धावांत दोन बळी घेतले आणि वॉशिंग्टन सुंदरने 19 षटकांत 58 धावांत दोन बळी घेतले. शार्दुल ठाकूरला फक्त 11 षटके गोलंदाजी करता आली. या दरम्यान, त्याने 55 धावा दिल्या आहेत.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला! राहुल-गिल या जोडीने इंग्लंडची झोप उडवली, तरी टीम इंडिया137 धावांनी पिछाडीवर
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारताने चौथ्या दिवशी दोन विकेट गमावून 174 धावा केल्या आहेत. भारत सध्या यजमान संघापेक्षा 137 धावांनी मागे आहे. इंग्लंडचा पहिला डाव 669 धावांवर संपला. त्याआधी, भारताने त्यांच्या पहिल्या डावात 358 धावा केल्या होत्या. शनिवारच्या खेळाच्या अखेरीस, केएल राहुल 87 धावांसह आणि शुभमन गिल 78 धावांसह खेळत आहेत.
केएल राहुलचं अर्धशतक
केएल राहुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 19 वे अर्धशतक 141 चेंडूत पूर्ण केले. त्याने गिलसोबत 116 धावांची भागीदारी केली आहे. भारत आता इंग्लंडपेक्षा 194 धावांनी मागे आहे.




















