Eng vs Ind 4th Test Day 2 : 'योद्धा' बनला ऋषभ पंत, नंतर डकेट आणि क्रॉलीच्या बॅटने ओकली आग, दोघांचेही शतक हुकले; दुसऱ्या दिवशी काय काय घडलं?
Eng vs Ind 4th Test Day 2 Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज गुरुवार 24 जुलै रोजी दुसरा दिवस आहे.
LIVE

Background
England vs India 4th Test Day 2 Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज गुरुवार 24 जुलै रोजी दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने 4 बाद 264 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतकी खेळी करत भारताला भक्कम सुरूवात करून दिली. सध्या रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर मैदानावर आहेत. आता लक्ष आहे, दुसऱ्या दिवशी भारत पहिल्या डावात इंग्लंडपुढे किती मोठं आव्हान उभं करतो.
टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंतला दुखापत
मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी, 68व्या षटकात क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करताना, चेंडू थेट पंतच्या उजव्या पायाच्या बूटावर आदळला. दुखापतीमुळे तो स्वतःच्या पायावर उभे राहू शकला नाहीत आणि त्याला रिटायर्ड हर्ट घोषित करून मैदानाबाहेर न्यावं लागलं. त्यांच्या पुनरागमनाबाबत सध्या अनिश्चितता आहे.
'योद्धा' बनला ऋषभ पंत, नंतर डकेट आणि क्रॉलीच्या बॅटने ओकली आग, दोघांचेही शतक हुकले; दुसऱ्या दिवशी काय काय घडलं?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याचा आज दुसरा दिवस होता. गुरुवारच्या खेळाअखेर इंग्लंडने पहिल्या डावात दोन विकेट गमावून 225 धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा ऑली पोप 20 धावांसह आणि जो रूट 11 धावांसह खेळत होते. सध्या इंग्लंड भारतापेक्षा 133 धावांनी मागे आहे. त्याआधी भारताचा डाव 358 धावांवर आटोपला.
पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही ऋषभ पंत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला, जो पायाच्या बोटाला फ्रॅक्चर असूनही फलंदाजीला आला होता. अंशुल कंबोजनेही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आहे.
अंशुल कंबोजने दिला इंग्लंडला दुसरा धक्का! बेन डकेट OUT
इंग्लंडला दुसरा धक्का अंशुल कंबोजने दिला. त्याने बेन डकेटला आऊट केले. 94 धावा काढल्यानंतर तो बाद झाला. इंग्लंडने दोन विकेट्सवर 197 धावा केल्या आहेत.




















