ENG vs IND, 3rd ODI Live Updates: भारतानं एकदिवसीय मालिका जिंकली; ऋषभ पंत- हार्दिक पांड्याची दमदार कामगिरी
ENG vs IND: एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना जिंकून भारताचा मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असेल. तर, या सामन्यात भारताला नमवून टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात उतरेल.
LIVE
Background
ENG vs IND, 3rd ODI Live Updates: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील निराशाजनक पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध आज खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात दमदार पुनरागमनाचा भारतीय संघाचा निर्धार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना जिंकून भारताचा मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असेल. तर, या सामन्यात भारताला नमवून टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात उतरेल.
भारत आणि इंग्लंड हेड टू हेड रेकार्ड
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 105 एकदिवसीय सामने खेळले गेले आहे. त्यापैकी 56 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, 44 सामन्यात पराभव स्वीकाराला आहेत. यातील दोन सामने टाय झाले आहेत. भारतानं मायदेशात इंग्लंडविरुद्ध 33 सामने जिंकले आहेत. तर, इंग्लंडनं त्यांच्या मायभूमीवर भारताला 23 वेळा पराभूत केलं आहे.
भारत- इंग्लंड यांच्यातील लाईव्ह सामना कधी, कुठे पाहणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यात आज (17 जुलै 2022) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर अखेरचा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होईल. तर, दुपारी 3.00 वाजता नाणेफेक होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. विविध भाषेतून सामन्याचा आनंद घेता येईल. तसेच सोनी लिव्ह अॅपवरही सामना पाहता येईल.
संघ-
भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, इशान किशन, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, यजुर्वेद्र चहल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
इंग्लंड:
जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टॉपले, क्रेग ओव्हरटन, सॅम करन.
हे देखील वाचा-
- PV Sindhu: पीव्ही सिंधूची जबरदस्त कामगिरी! सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झि यिवर पडली भारी
- Singapore Open: पीव्ही सिंधू- वांग झि यि यांच्यात आज रंगणार थरार; कोणाचं पारडं राहिलंय जड, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
- Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय खेळाडूंची घोषणा