Rohit Sharma On Dinesh Karthik: रोहित शर्माकडं दिनेश कार्तिकसाठी खास प्लॅन; टी-20 विश्वचषकापूर्वीच केलं स्पष्ट
T20 World Cup 2022: भारतीय संघात फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या दिनेश कार्तिकसाठी (Dinesh Karthik) भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) खास प्लॅन बनवलाय.

T20 World Cup 2022: भारतीय संघात फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या दिनेश कार्तिकसाठी (Dinesh Karthik) भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) खास प्लॅन बनवलाय. रोहित शर्माला ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला सामन्याचा जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. भारताच्या मागील काही सामन्यात संघ व्यवस्थापनानं दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांचाा वेगवेगळ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. आशिया चषक 2022 स्पर्धेत पंतला अधिक संधी मिळाल्या. तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दिनेश कार्तिकला प्राधान्य देण्यात आलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं सहा विकेट्सनं विजय मिळवला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मानं प्रेस कॉन्फर्स घेतली. ज्यात तो म्हणाली," माझी इच्छा होती की, पंत आणि कार्तिक दोघांनाही टी-20 विश्वचषकापूर्वी वेळ मिळावा. जेव्हा आम्ही आशिया चषक खेळायला गेलो, तेव्हा दोघंही खेळण्यासाठी तयार होते. परंतु, त्यावेळी दिनेश कार्तिकला जास्त वेळ देण्याची गरज आहे, असं मला वाटलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत त्याला फलंदाजीची खूप कमी संधी मिळाली. संपूर्ण मालिकेत त्यानं फक्त तीन चेंडू खेळले आहेत. जे खूप कमी आहेत."
पंतलाही वेळ मिळायला हवा
"पंतलाही खेळासाठी वेळ हवा आहे. पण ज्या प्रकारे मालिका सुरू होती, माझ्यासाठी कंसिस्टेन्ट बॅटिंग लाइन-अपसह गरजेचं होतं." भारताला आता 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. "मला माहित नाही की. आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय करणार आहोत. आपल्याला त्यांची गोलंदाजी पाहावी लागेल आणि त्यांच्या गोलंदाजीला चांगलं हाताळू शकतील अशा फलंदाजांना संधी द्यावी लागेल. आम्हाला आमच्या बॅटिंग लाइन-अपसह फ्लेक्जिबल राहायचं आहे. जर आम्हाला डावखुरा फलंदाजाची गरज भासल्यास आम्ही त्यानुसार निर्णय घेऊ. आम्ही सर्व खेळाडूंचा काळजीपूर्वक वापर करू, टी-20 विश्वचषकापूर्वी सर्व खेळाडूंना वेळ मिळायला हवा", असंही रोहित शर्मानं म्हटलंय.
दिनेश कार्तिकचा जबरदस्त फॉर्म
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात जबरदस्त कामगिरी केल्यानंतर दिनेश कार्तिकची भारतीय संघात निवड झाली. त्यानंतर भारताच्या अनेक विजयात दिनेश कार्तिकनं महत्वाची भूमिका बजावली. ज्यामुळं ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात त्याची भारतीय संघात निवड झालीय.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
