Eng vs Ind 4th Test : दुष्काळात तेरावा महिना... मँचेस्टर टेस्टमधून ऋषभ पंत बाहेर? नव्या VIDEO मुळे खळबळ, 'या' स्टारचे नशीब चमकेल
England vs India 4th Test Update : मँचेस्टरमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध चौथ्या टेस्ट सामन्यासाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे.

Dhruv Jurel Set To Replace Rishabh Pant In Manchester Test : मँचेस्टरमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध चौथ्या टेस्ट सामन्यासाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे, कारण शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे, अशा वेळी संघासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत. चौथ्या टेस्टमध्ये तो खेळणार की नाही, यावर अजूनही संभ्रम कायम आहे.
लॉर्ड्समध्ये झाली होती दुखापत
तिसऱ्या टेस्टदरम्यान लॉर्ड्समध्ये ऋषभ पंतच्या डाव्या हाताच्या तर्जनीला (दुसरी बोट) विकेटकीपिंग करताना चेंडू लागला होता. यानंतर त्याने त्या सामन्यात विकेटकीपिंग न करता फक्त फलंदाजी केली. त्याच्या जागी ध्रुव जुरेलने कीपिंग केली होती. दुखापतीची तीव्रता पाहून संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळे चौथ्या टेस्टमध्ये तो खेळेल की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
प्रॅक्टिसमधलं व्हिडीओ झाला चर्चेचा विषय
ईएसपीएन क्रिकइन्फोने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे पंतच्या खेळण्यावर आणखी शंका निर्माण झाली आहे. या व्हिडीओमध्ये ध्रुव जुरेल विकेटकीपिंगचा सराव करताना दिसतोय. जुरेल हा संघातील दुसरा कीपर आहे आणि जर पंत खेळू शकला नाही, तर जुरेलचा अंतिम 11 मध्ये समावेश जवळपास नक्की मानला जातो.
कोच रायन टेन डोइशेट यांनी दिली माहिती
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी सांगितले की, ऋषभ पंत वेळेवर फिट होईल आणि विकेटकीपिंगही करू शकेल. त्यांनी स्पष्ट केलं की पंतने मागील टेस्टमध्ये दुखापतीनंतरही जबरदस्त फलंदाजी केली. "तो मँचेस्टरमध्ये टेस्टपूर्वी फलंदाजी करेल. पण कीपिंगची जबाबदारी देण्याआधी आम्हाला खात्री करावी लागेल की तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे."
Dhruv Jurel gets some keeping work in ahead of Manchester - will he be the designated (wk) with Pant as a pure bat? 🤔
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 19, 2025
Read more: https://t.co/ZnEDLd9b9X | #ENGvIND pic.twitter.com/BKWfWZ4VTf
पंतची मालिकेतील कामगिरी कशी होती?
ऋषभ पंतने या मालिकेत बॅटने शानदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या टेस्टमधल्या दोन्ही डावांमध्ये शतक ठोकलं आणि इतिहास रचला. शुभमन गिलनंतर तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये 425 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा -





















