Devdutt Padikkal Century : 14 चौकार, 1 षटकार अन् 150 धावा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध देवदत्त पडिक्कलची मॅरेथॉन इनिंग, वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेआधी BCCI अन् गंभीरसमोर मोठा पेच
Devdutt Padikkal Century : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या आशिया कप 2025 मध्ये खेळत आहे. त्यानंतर, टीम इंडिया घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.

IND-A vs AUS-A, 1st unofficial Test : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या आशिया कप 2025 मध्ये खेळत आहे. त्यानंतर, टीम इंडिया घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची संघ अद्याप जाहीर झालेला नाही, परंतु कसोटी संघाबाहेर असलेला डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलने ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावून पुनरागमनाचा जोरदार दावा केला आहे. ज्यामुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढणार आहे.
150*(275) for Devdutt Padikkal against Aus A.
— Aditya Saha (@Adityakrsaha) September 19, 2025
He is coming back for his place in Indian Test team. 🔥 pic.twitter.com/h9gnn13377
पडिक्कलची 150 धावांची खेळी अन्... (Devdutt Padikkal hundred on India A)
ऑस्ट्रेलिया अ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे, लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. प्रथम फलंदाजी करताना, कांगारूंनी त्यांचा पहिला डाव 532 धावांवर घोषित केला. त्यानंतर, भारतीय अ संघाने देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांचे उत्कृष्ट शतक साकारले. पडिक्कलने 281 चेंडूत 14 चौकार आणि एक षटकार मारत 150 धावा केल्या. पडिक्कलने आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात पुनरागमनाचा दावा बळकट केला आहे. पडिक्कलने आतापर्यंत फक्त दोन कसोटी सामने खेळले आहेत, तीन डावांमध्ये 30 च्या सरासरीने 90 धावा केल्या आहेत.
Devdutt Padikkal is the second centurion for India A at Ekana 💯 💯 pic.twitter.com/wWLpgS1pbn
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 19, 2025
ध्रुव जुरेलने 140 धावांची शानदार खेळी अन्... (Dhruv Jurel scores century in India A's fightback against Australia A)
ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्यात, भारतीय अ संघाला देवदत्त पडिक्कलसह यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने 135 धावांची शानदार खेळी देखील पाहायला मिळाली. ऋषभ पंत पूर्णपणे बरा होऊ शकला नाही तर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी जुरेलचा अंतिम संघात समावेश निश्चित मानला जात आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी जुरेलचा दुसरा यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला होता, जिथे त्याला ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि टीम इंडियाने 6 धावांनी विजय मिळवला.
हे ही वाचा -





















