एक्स्प्लोर

LSG vs DC IPL 2026 : लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडले खाते

LSG vs DC IPL 2026 : समीर रिझवीच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 6 विकेट्सने जिंकत लखनऊवर दणदणीत विजय मिळवला.

DC beat LSG by 6 wickets IPL 2026 : आयपीएल 2026 मधील पाचवा सामना एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला गेला. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय अचूक ठरला. दिल्लीच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत लखनौ सुपर जायंट्सला अवघ्या 18.4 षटकांत 141 धावांवर रोखले. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना समीर रिझवी याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 6 विकेट्सने जिंकत लखनऊवर दणदणीत विजय मिळवला.

कर्णधार ऋषभ पंत नापास

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससाठी कर्णधार ऋषभ पंत आणि मिचेल मार्श यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनीही संथ सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने अवघ्या 48 धावांत दोन गडी गमावले. कर्णधार ऋषभ पंत 9 चेंडूंत 7 धावा करून धावबाद झाला. त्यानंतर अॅडम मार्करम 8 चेंडूंत 11 धावा करून अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.

निम्मा संघ 71 धावांवर तंबूत

त्यानंतर लखनऊने 49 धावांवर आयुष बडोनीच्या रूपाने आपली तिसरी विकेट गमावली. आयुष बडोनीने तीन चेंडूंचा सामना केला पण त्याला खाते उघडता आले नाही. तो नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर, निकोलस पूरन लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पूरन आठ चेंडूंमध्ये 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवने मिचेल मार्शला बाद करून एलएसजीला पाचवा धक्का दिला. मार्शने 28 चेंडूंमध्ये 35 धावा केल्या. अशाप्रकारे, लखनऊ सुपर जायंट्सचा निम्मा संघ 71 धावांवर तंबूत परतला.

अब्दुल समद एकटा नडला अन्....

त्यानंतर अब्दुल समद एक चांगली खेळी खेळून बाद झाला. अब्दुल समदने कठीण परिस्थितीत एलएसजीसाठी महत्त्वपूर्ण खेळी करत 25 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या. तो नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर लखनऊचे नियमित अंतराने गडी बाद होत गेले आणि त्यांचा संघ 18.4 षटकांत 141 धावांवर गारद झाला. 

केएल राहुल शून्यावर OUT...

लखनऊ सुपर जायंट्सने दिलेल्या 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात केएल राहुल आणि पथुम निस्संका यांनी केली. मात्र, मोहम्मद शमीने डावाच्या पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला बाद केले. राहुलला एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का बसला, जेव्हा नितीश राणा मोहसिन खानच्या गोलंदाजीवर 15 धावांवर बाद झाला. राणाने 17 चेंडूंमध्ये 15 धावा केल्या.

समीर रिझवीने ठोकले अर्धशतक...

त्यानंतर प्रिन्स यादवने पाचव्या षटकात दिल्ली कॅपिटल्सला दोन धक्के दिले. प्रथम, त्याने पथुम निस्संकाला एका धावेवर बाद केले. त्यानंतर, त्याने कर्णधार अक्षर पटेलला शून्यावर बाद केले. शेवटी समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी पाचव्या विकेटसाठी एक उत्कृष्ट भागीदारी केली. कठीण परिस्थितीत, समीर रिझवीने दिल्ली कॅपिटल्ससाठी एक शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 37 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pat Cummins : बेस्ट टीम मैदानात उतरवल्यानंतरही घरच्या मैदानावर बांगलादेशकडून पराभव, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
बांगलादेशनं 23 वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवलं, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget