Danish Kaneria on Rishabh Pant and Hardik Pandya : मँचेस्टरमध्ये झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या भागिदारीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. पांड्या-पंतच्या भागिदारीबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने बोलताना,'या भागिदारीने युवराज सिंह आणि मोहम्मद कैफ यांच्यातील 2002 सालच्या नेटवेस्ट सिरीजमधील भागिदारीची आठवण करुन दिली.' असं म्हणाला.
विशेष म्हणजे 20 वर्षांपूर्वीच इंग्लंडच्या भूमीत भारताच्या कैफ, युवराज जोडीने नेटवेस्ट सिरीजच्या मालिकेच्या अखेरच्या निर्णायक सामन्यात भारताला अप्रतिम भागिदारीने विजय मिळवून दिला होता. त्याप्रमाणेच आता युवा खेळाडू ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी एक अप्रतिम विजय भारताला मिळवून दिला. याबाबत कनेरियाने आपल्या यू-ट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, 'ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याची भागिरादी मला नेटवेस्ट ट्रॉफी फायनलमधील युवराज आणि कैफच्या भागिदारीची आठवण करुन दिली. तिथेही टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर तंबूत परतले. ज्यानंतर कैफ-युवराज या युवा खेळाडूंनी विजय मिळवून दिला होता. पंत आणि पांड्या या युवा खेळाडूंनीही अशाचप्रकारे इंग्लंडच्या गोलंदाजी अटॅकला संपवलं.''
भारताचा 5 विकेट्सने विजय
हार्दिक पांड्या ऋषभ पंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्या जोडीनं संघाचा डाव सावरून भारताच्या विजयाचा पाया रचला. भारताकडून ऋषभ पंतनं 113 चेंडूत नाबाद 125 धावांची खेळी केली. तर, हार्दिक पंड्यानं 55 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं.
हे देखील वाचा-