T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आगामी विश्वचषक खेळला जाणार आहे. दरम्यान, 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने खेळवले जातील. याच मेगा इव्हेंटसाठी ग्रुप आणि शेड्युल निश्चित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma नेतृत्वाखाली भारतीय संघानं आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. यामुळं टी-20 विश्वचषकात भारत चांगली कामगिरी बजावेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
कसा असेल ग्रुप?
ग्रुप 'ए' मध्ये नामीबिया, श्रीलंका, यूएई आणि नेदरलँड्सला जागा मिळाली आहे. तर, ग्रुप 'बी' मध्ये आयर्लंड, स्कॉटलँड, वेस्ट इंडीज आणि झिम्बॉब्वेनं स्थान मिळवलं आहे. तसेच ग्रुप '1' मध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, ग्रुप 'ए' चा विजेता संघ आणि ग्रुप 'बी' चा रनरअप संघाचा ग्रुप '1' मध्ये समावेश करण्यात येईल. ग्रुप '2' मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर ग्रुप 'बी' चा विजेता संघ आणि ग्रुप 'ए'चा रनरअप संघ ग्रुप '2' मध्ये एन्ट्री करेल.
भारताच्या ग्रुपमधील संघ-
ग्रुप 1 | ग्रुप 2 |
अफगाणिस्तान | भारत |
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान |
इंग्लंड | दक्षिण आफ्रिका |
न्यूझीलंड | बांग्लादेश |
ग्रुप 'ए' मधील विजेता संघ | ग्रुप 'बी' मधील विजेता संघ |
ग्रुप 'बी' मधील रनरअप संघ | ग्रुप 'ए' रनरअप संघ |
टी-20 विश्वचषकातील सामने कुठे खेळवले जाणार?
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-