Ravindra Jadeja Stunning Catch: भारत आणि इंग्लंड (ENG Vs IND) यांच्यात आज एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) भेदक गोलंदाजी करत इंग्लंडला 259 धावांवर रोखलं. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजानं (Ravindra Jadeja) त्याची जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणना का केली जाते? हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. 


या सामन्यातील इंग्लंडच्या डावातील हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर कर्णधार जोस बटलरनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क न झाल्यानं चेंडू जास्त दूर जाऊ शकला नाही. त्यावेळी रवींद्र जडेजा डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यानं धावात आणि उडी मारून झेल पकडला. जोस बटलर आऊट झाला नसता तर इंग्लंडचा स्कोर 300 जाण्याची शक्यता होती. 


व्हिडिओ-



इंग्लंडचा डाव 259 धावांवर आटोपला
हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या संघानं गुडघे टेकले. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संघ 45.5 षटकात 259 धावांवर ढेपाळला.  इंग्लंडकडून जोस बटलरनं (60 धावा) एकाकी झुंज दिली.


भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.


इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टॉपली, क्रेग ओव्हरटन.


हे देखील वाचा-