CWG 2022: भारतीय हॉकी संघानं वेल्सला 4-1 नं नमवलं, सलग चौथ्यांदा कॉमनवेल्थच्या उपांत्य फेरीत
Commonwealth Games 2022: वेल्सविरुद्ध ( Wales Men's Hockey Team) 4-1 असा विजय नोंदवून भारतीय पुरुष हॉकी संघानं (India Men's Hockey Team) बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय.
Commonwealth Games 2022: वेल्सविरुद्ध ( Wales Men's Hockey Team) 4-1 असा विजय नोंदवून भारतीय पुरुष हॉकी संघानं (India Men's Hockey Team) बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे, भारतीय हॉकी संघानं सलग चौथ्यांदा कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवलंय.
ट्वीट-
पहिल्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासच्या बोटाला दुखापत
वेल्सविरुद्धच्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघानं दमदार शानदार सुरुवात केली आहे. परंतु, वेल्सनं चांगला बचाव करत भारताला एकही गोल करू दिला नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासच्या बोटाला दुखापत झाली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये पहिला गोल
भारतीय हॉकी संघानं संघानं दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं दोन गोल करून सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतासाठी दोन्ही गोल हरमनप्रीतनं केले.
तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताची सामन्यावर मजबूत पकड
तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाने सामन्यावर पकड कायम ठेवली. भारताला दोनदा पेनल्टी कॉर्नर मिळालं, पण दोन्ही वेळा अपयश आलंय. मात्र, दुसऱ्या पेनल्टीदरम्यान भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. याचा फायदा घेत हरमनप्रीत सिंगनं वेल्सविरुद्ध गोल करत हॅट्ट्रिक साधलीय. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं 3-0 अशी आघाडी घेतलीय.
भारताचा 4-0 नं सामना जिंकला
गुरजंतने चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताला 4-0 अशी आघाडी मिळवून देण्यास मदत केली. परंतु, पंचांनी गोल देण्यास नकार दिला. पण भारतानं रिव्ह्यू घेतला आणि व्हिडिओ अंपायरनं भारताच्या बाजूनं निर्णय दिलाय. चौथ्या क्वार्टरमध्ये वेल्सनं एक गोल करून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत सामना भारताच्या बाजूनं झुकला होता. अखेर भारतानं सामना 4-0 अशा फरकानं जिंकलाय.
हे देखील वाचा-
- CWG 2022: 'अभी तो और मेडल आने बाकी हैं!' ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचं भारतीय खेळाडूंसाठी खास ट्वीट
- CWG 2022: यालाचं म्हणतात, जगावर छाप सोडणं; सुवर्णपदक जिंकून पाकिस्तानचा वेटलिफ्टर म्हणतोय, 'मीराबाई चानू माझी प्रेरणास्रोत!'
- Country-wise Medal Tally: सहाव्या दिवशी पाच पदक जिंकूनही भारताची पदकतालिकेत घसरण, ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी कायम