Robin Uthappa : रॉबिन उथप्पाला कन्यारत्न, नावही अगदी हटके
Uthappa's Baby Girl Name : भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आणि सध्या चेन्नई सुपरकिंग्स संघात असणाऱ्या रॉबिन उथप्पाच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला आहे.
Robin Uthappa Baby Girl : भारतीय क्रिकेटर आणि आयपीएल (IPL) स्पर्धेत सध्या चेन्नई सुपर किंग्समधून (CSK) खेळणारा रॉबिन उथप्पाला (Robin Uthappa) कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. रॉबिन उथप्पा दुसऱ्यांदा बाबा झाला असून त्याची पत्नी शीतल हीने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. रॉबिन उथप्पा याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) करत ही माहिती दिली आहे. यावेळी रॉबिन उथप्पा, त्याची पत्नी आणि मुलासह नुकतीच जन्माला आलेली मुलगीही दिसत आहे.
नावही ठेवलं हटके
रॉबिन उथप्पा याने त्याच्या मुलीचं नाव ट्रिनिटी थिया उथप्पा (Trinity Thea Uthappa) असं ठेवलं आहे. रॉबिनने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, 'प्रेमाने भरलेल्या मनाने आम्ही आमच्या घरी नव्या पाहुण्याला सर्वांसमोर आणू इच्छितो, भेटा माझी मुलगी ट्रिनिटी थिया उथप्पाला.' तसंच रॉबिनने पुढे लिहिलं आहे की, जगात तू आम्हाला आई-वडिल म्हणून निवडलं यामुळे आम्ही खूप चांगलं फिल करत आहोत. मला आणि शितलला पालक म्हणून निवडण्याकरता तुझे आभार.
View this post on Instagram
2015 साली उथप्पा अडकला विवाहबंधनात
रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याने 2015 साली त्याची गर्लफ्रेंड शीतलसोबत लग्न केलं. दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते, ज्यानंतर त्यांनी लग्न केलं. भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पा हा ईसाई (Christian) धर्माचा असून त्याची पत्नी शीतल हिंदू आहे. दोघांनाही विवाह करताना धर्म वेगवेगळा असल्याने अडचणींचा सामना करावा लागला होता. पण लग्नानंतर दोघेही घरच्यांची मान्यता मिळवण्यात यशस्वी झाले.
हे देखील वाचा-