Glenn Maxwell Injury : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ग्लेन मॅक्सवेल टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर
Glenn Maxwell Injury : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल हा भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. मॅक्सवेल हा दुखापतीतून अजून पूर्णपणे सावरला नसल्याचे वृत्त आहे.
Glenn Maxwell Injury : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. मागील काही दिवसांपासून मॅक्सवेल हा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून तो संघात पुनरागमन करणार होता. आता, मात्र तो या मालिकेला मुकणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाला हा मोठा धक्का आहे.
व्हिक्टोरिया आणि मेलबर्न दरम्यान खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान ग्लेन मॅक्सवेल हा स्लीपमध्ये झेल घेण्याच्या प्रयत्नात असताना त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडून जावे लागले होते. ग्लेन मॅक्सवेलची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे वृत्त आहे.
Glenn Maxwell cleared of a fracture for this knock on the wrist while fielding. Victoria still assessing when he’ll bat in the second innings #SheffieldShield pic.twitter.com/ZOZ2kpnQZV
— Jack Paynter (@jackpayn) February 21, 2023
ग्लेन मॅक्सवेल हा दुखापतग्रस्त असल्याने बिग बॅश लीगमध्येदेखील खेळला नव्हता. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन करणार होता. ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ टीम इंडियाविरोधात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर
एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची निवड केली आहे. पहिल्या सामन्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध नाही. त्यामुळे संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. अखेरच्या दोन सामन्यासाठी रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. संघात के. एल. राहुल, विराट कोहली या खेळाडूंचा समावेश आहे.
पहिला एकदिवसीय सामना हा 17 मार्च रोदजी मुंबईत होणार आहे. तर, दुसरा एकदिवसीय सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणम आणि तिसरा एकदिवसीय सामना 20 मार्च रोजी चेन्नईमध्ये होणार आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.