David Warner Dance : सोशल मीडियाच्या मैदानात डेव्हिड वॉर्नर बनला अल्लू अर्जून, पुष्पाच्या गाण्यावरचा वॉर्नरचा VIDEO पाहाच!
David Warner Dance : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर कायम सोशल मीडियावरील त्याच्या हटके व्हिडीओजसाठी चर्चेत असतो. आताही त्याने एक धमाल व्हिडीओ शेअर केला आहे.
David Warner Dance : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) क्रिकेटच्या मैदानासह सोशल मीडियावरही फटकेबाजी करतच असतो. सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टिव्ह असणारा वॉर्नर स्वत:चा तसंच कुटुंबासोबतचे विविध व्हिडिओ पोस्ट करत असतो. हे व्हिडिओ तो इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर अपलोड करत असतो. पण भारतात टिकटॉकवर बंदी आल्यापासून वॉर्नर इन्स्टा रील्समधून अधिक व्हिडिओ शेअर करत असतो. तो हिंदी चित्रपटांचे डायलॉग, गाणी अशा प्रकारचे व्हिडीओ करत असतो. आताही त्याने एक धमाल व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे.
का आहे व्हिडिओमध्ये?
डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो दक्षिणचा सुपरस्टार अल्लू अर्जूनचा आगामी चित्रपट पुष्पामधील लूकमध्ये दिसत आहे. दरम्यान मूळात हा व्हिडिओ अल्लू अर्जूनचाच असून वॉर्नरने केवळ स्वत:चा चेहरा त्याठिकाणी एडिट करुन लावला आहे. पुष्पा हा चित्रपट येत्या 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून हा चित्रपट दोन पार्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अल्लू अर्जूनसह अभिनेत्री म्हणून रश्मिका मंधाना झळकणार आहे.
2.6 मिलियनहून अधिक Views
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायर होत असून अनेकजण यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही यावर कमेंट केली आहे. त्याने एक मजेशीर प्रश्न विचार, ‘सगळं ठिक आहे ना?’ असं मिश्किलपणे विचारलं आहे. हा व्हिडिओ अपलोड होऊन 16 तासानंतर व्हिडीला 2.6 मिलियनपर्यंत व्ह्यूयज (Views) मिळाले आहेत. तर 23 हजारपर्यंत कमेंट्स व्हिडिओवर पडल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- पंढरपूरच्या बिली बाऊडनची हवा, अंपायरच्या मैदानावरील करामतीवर इंग्लंडचा दिग्गज खेळाडूही फिदा
- Indian ODI Team vice captain: भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार कोण? 'हे' 3 खेळाडू शर्यतीत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha