Ajinkya Rahane, Hanuma Vihari in Team India : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या टी20 विश्वचषक 2022 खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धेनंतर लगेचच भारत आणि न्यूझीलंड आणि नंतर डिसेंबरमध्ये बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया 14 डिसेंबरपासून बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने संघ देखील जाहीर केला आहे. यात अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) या अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी हनुमा आणि रहाणेला संघात न घेण्याबाबतचं कारण सांगितलं.

कसोटी संघात मधल्या फळीबद्दल बोलताना चेतन शर्मा म्हणाले, “हनुमाबद्दल खूप चर्चा झाली. मात्र मधल्या फळीत स्थान न मिळाल्याने त्याला संधी देण्यात आली नाही. प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांना मधल्या फळीत स्थान दिले जाईल. शुभमन गिलही संघाचा भाग असेल.'' पुढे बोलताना शर्मा म्हणाले, ''या दोन्ही खेळाडूंमध्ये कमतरता आहे असे नाही. मात्र संघ निवडीदरम्यान कॉम्बीनेशनची काळजी घ्यावी लागते. यादरम्यान बांग्लादेशच्या खेळपट्ट्यांबाबतही विचार करण्यात आला आहे.'' पुढे रहाणेबद्दल बोलताना शर्मा म्हणाले, ''रहाणेला अजून धावा करण्याची गरज आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी संघाचे दरवाजे नेहमीच खुले असतात. अजिंक्य रहाणे खूप प्रयत्न करत आहे, त्याने धावाही केल्या आहेत. मात्र संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला आणखी धावा कराव्या लागतील. आता रणजी करंडक आणि विजय हजारे ट्रॉफी येणार आहे. आशा आहे की त्यात तो चांगली कामगिरी करुन संघात पुनरागमन करेल'' 

बांग्लादेशविरुद्ध कसोटी संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.  

भारत आणि बांग्लादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर  झहूर अहमद चौधरी स्टेडियम
दुसरा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका

हे देखील वाचा-

Team India : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, टी20 मध्ये हार्दिक तर एकदिवसीय सामन्यांत शिखरकडे नेतृ्त्त्व