Team india for New Zealand Series : सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) खेळत आहे. दरम्यान या भव्य स्पर्धेनंतर लगेचच भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये मर्यादीत षटकांचे सामने खेळणार असून यामध्ये तीन टी20 तर तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी नुकताच बीसीसीआयनं सघ जाहीक केला असून टी20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik pandya) तर एकदिवसीय संघाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) असणार आहे. यावेळी दोन्ही संघामध्ये बऱ्यापैकी खेळाडू सारखे असले दिसून येत आहे. पण दोन्ही संघाचे कर्णधार वेगळे असून टी20 चा कर्णधार हार्दिक एकदिवसीय संघात नसून शिखर ही टी20 संघात नाही आहे. याशिवाय कुलदीप सेन हा आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडू एकदिवसीय संघात निवडला गेला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टी20 संघ?

हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल , मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय संघ?

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक

टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौरा करणार आहे. दरम्यान, 18 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 13 दिवसांत 6 सामने खेळले जातील, ज्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. आगामी टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर पाच दिवसांनी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळली जाईल. 

कधी, कुठं रंगणार सामने?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर आणि तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे माउंट मॉन्गनुई आणि नॅपियर येथे खेळला जाईल. दरम्यान, एकदिवसीय मालिकेला 25 नोव्हेंबर ईडन पार्क येथे होईल. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर रोजी सीडन पार्क आणि तिसरा एकदिवसीय साममना 30 नोव्हेंबर रोजी हेग्ले ओवल येथे पार पडणार आहे. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेच वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर वेलिंग्टन
दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर माउंट मॉन्गनुई
तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर नॅपियर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 25 नोव्हेंबर ऑकलँड
दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर हेमिल्टन
तिसरा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर क्राइस्टचर्च

हे देखील वाचा-

T20 World Cup 2022 : जे 2011 मध्ये घडलं, तसंच यंदाही घडतंय, पुन्हा इतिहास घडणार, भारत विश्वचषक जिंकणार?