India vs Bangladesh, T20 World Cup : भारतीय संघ (Team India) टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) आता बांग्लादेशविरुद्ध (India vs Bangladesh) मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेडच्या मैदानावर उद्या अर्थात 2 नोव्हेंबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान विश्वचषकात पुढील फेरीत एन्ट्रीसाठी दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे याआधी या दोन संघांमध्ये 11 टी20 सामने झाले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 10 सामने जिंकले असून बांग्लादेशचा केवळ एकदा विजय झाला आहे. तर आता विश्वचषकात होणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघ आमने-सामने आले असतानाचे काही खास रेकॉर्ड्स पाहू...



  1. सर्वाधिक धावसंख्या : टीम इंडियाने 6 जून 2009 रोजी बांग्लादेशविरुद्ध 5 विकेट्स गमावत 180 रन केले होते. 

  2. सर्वात कमी धावसंख्या : मीरपुर येथे 24 फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या टी20 सामन्यात बांग्लादेशचा संपूर्ण संघ 121 रनवर ऑलआऊट झाला होता.

  3. सर्वात मोठा विजय : टीम इंडियाने फेब्रुवारी 2016 मध्ये मीरपूर T20 मध्ये बांग्लादेशचा 45 धावांनी पराभव केला होता. धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे. तर मार्च 2014 मध्ये भारताने बांग्लादेशचा 8 गडी राखून पराभव केला होता. विकेट्सच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला. 

  4. सर्वाधिक धावा: रोहित शर्माने बांग्लादेशविरुद्ध टी-20 मध्ये 452 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 41.09 आणि स्ट्राईक रेट 144.40 आहे.

  5. सर्वोत्तम खेळी: रोहित शर्माने मार्च 2018 मध्ये कोलंबो येथे झालेल्या T20 सामन्यात 61 चेंडूत 89 धावा केल्या होत्या.

  6. सर्वाधिक 50+ धावा: हा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. हिटमॅनने बांग्लादेशविरुद्ध टी20 मध्ये 5 वेळा 50+ धावा केल्या आहेत.

  7. सर्वाधिक षटकार: रोहित शर्माने बांग्लादेशविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये 21 षटकार ठोकले आहेत.

  8. सर्वाधिक विकेट्स: युजवेंद्र चहलने भारत-बांग्लादेश सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची गोलंदाजी सरासरी 17 आणि इकॉनॉमी रेट 6.37 होता.

  9. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी: दीपक चाहरने नोव्हेंबर 2019 मध्ये नागपूर T20 मध्ये 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

  10. सर्वोत्तम विकेटकिंपिंग: एमएस धोनीने 5 सामन्यात 7 बळी यष्टीरक्षक म्हणून घेतले आहेत. त्याने 3 झेल आणि 4 स्टंपिंग केले आहेत.


हे देखील वाचा-


IND vs BAN : बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा, पण पाऊस व्यत्यय आणणार का?