Team India Playin 11 :ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारताने आतापर्यंत 3 सामने खेळले असून यातील दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान आता उर्वरीत सामने भारतासाठी जिंकणं महत्त्वाचं असून भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या शक्यतेबाबत बोलताना माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

सौरव गांगुली म्हणाला, 'भारताने आतापर्यंत फक्त एकच सामना गमावला आहे. हा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल. प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करत आहे. मला आशा आहे की भारतीय संघ फायनलही खेळेल. पण आधी त्यांना सेमीफायनलमध्ये पोहोचू द्या, त्यानंतर त्यांना शेवटचे दोन सामने (सेमीफायनल आणि फायनल) खेळायचे आहेत आणि हे दोन सामने कोणाच्याही बाजूने जाऊ शकतात. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (सीएबी) वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) सौरव गांगुलीने ही प्रतिक्रिया दिली. सोमवारी झालेल्या या बैठकीत नवीन प्रशासनाला काम सोपवण्यात आले. CAB ची सूत्रे आता सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहाशीष सांभाळणार आहे. CAB चे नवे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.

उर्वरीत सामने टीम इंडियासाठी महत्त्वाचे

स्पर्धेत भारताला रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाला 5 विकेट्सच्या फरकाने सामना गमवावा लागला. दरम्यान या पराभवामुळे भारताचं गुणतालिकेत पहिलं स्थानही गेलं असून आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्याने भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ज्यामुळे उर्वरीत दोन सामने जिंकून आरामात सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. पण सोबतच इतर संघ कशी कामगिरी करतील हे देखील महत्त्वाचं असेल. शिवाय ऑस्ट्रेलियात पावसाचा व्यत्यय सामन्यांमध्ये येत आहे, भारताच्या उर्वरीत दोन सामन्यातही पाऊस आला आणि सामने झाले नाहीत, तर देखील भारताचं पुढे जाणं अवघड होऊ शकतं. 

अशी आहे भारत असणाऱ्या ग्रुप 2 गुणतालिका

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णीत गुण नेट रनरेट
1 दक्षिण आफ्रिका 3 2 0 1 5 2.772
2 भारत 3 2 1 0 4 0.844
3 बांग्लादेश 3 2 1 0 4 -1.533
4 झिम्बाब्वे 3 1 1 1 3 -0.050
5 पाकिस्तान  3 1 2 0 2 0.765
6 नेदरलँड्स 3 0 3 0 0 -1.948

हे देखील वाचा-

T20 World Cup 2022 : जे 2011 मध्ये घडलं, तसंच यंदाही घडतंय, पुन्हा इतिहास घडणार, भारत विश्वचषक जिंकणार?