एक्स्प्लोर

Rohit Sharma : दुसऱ्या कसोटीलाही कॅप्टन रोहित शर्मा मुकणार, समोर आली महत्त्वाची माहिती

Team India : भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत दुखापतीमुळे कॅप्टन रोहित शर्मा खेळू शकला नसून आता दुसऱ्या कसोटीतही तो खेळणार नसल्याचं समोर येत आहे.

Rohit Sharma in IND vs BAN Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून एकदिवसीय मालिकेत पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. पण या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच अनुपस्थित आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत (India vs Bangladesh 1st Test) तो संघात नव्हता. ज्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो फिट होऊन संघात परतेल अशी माहिती समोर येत होती. पण आता त्याच्या प्रकृतीबाबत संघ व्यवस्थापन कोणतीत जोखीम पत्करणार नसल्याने त्याला विश्रांती देण्याकरता तो दुसऱ्या कसोटीत संघात नसेल अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध होणार नाही. रोहित संघात सामील होईल अशी अपेक्षा होती पण आता तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने दुसरा सामनाही तो खेळणार नाही असं समोर येत आहे. भारताच्या आगामी मालिकेतील महत्त्वाचे सामने पाहता बीसीसीआय आणि निवड समितीला कोणताही धोका पत्करायचा नाही, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कसोटी मालिकेत भारताची आघाडी

भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत भारतानं (Ind vs Ban) मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली.

कसा आहे भारतीय संघ?

शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील दोन युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील दोन युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 मे 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सWare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 May 2024TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 एप्रिल 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील दोन युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील दोन युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
Nashik : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक बालंबाल बचावला
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक बालंबाल बचावला
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
Embed widget