T20 World Cup Qualified 2026 : भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बड्या संघांना टक्कर देणार 'ही' टीम, मारली धडाकेबाज एन्ट्री
Canada qualify for men T20 World Cup 2026 : सध्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे, परंतु त्यानंतर 8 महिन्यांनी 2026 चा टी-20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे.

2026 T20 World Cup Qualified Teams List : सध्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे, परंतु त्यानंतर 8 महिन्यांनी 2026 चा टी-20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. भारत आणि श्रीलंका पुढील वर्षी टी-20 वर्ल्ड कप आयोजित करणार आहेत, ज्यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. आतापर्यंत एकूण 13 संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले आहेत, ज्यामध्ये सर्वात नवीन प्रवेश कॅनडा आहे. कॅनडाचा संघ अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी जिंकून वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असेल.
छोटा पॅकेट, बडा धमाका!
कॅनडाने बहामासविरुद्ध आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप अमेरिका रीजन फायनल 2025 जिंकून या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्यांनी पाचही सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आता पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत कॅनडा मोठ्या संघांना कठीण आव्हान देऊ इच्छितो. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बहामासचा संपूर्ण संघ 57 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरादाखल कॅनडाने 6 षटकांत 61 धावांत तीन विकेट गमावून सामना जिंकला.
The others to have already qualified are the hosts India and Sri Lanka, as well as Afghanistan, Australia, Bangladesh, England, Ireland, New Zealand, Pakistan, South Africa, USA and West Indies pic.twitter.com/pcJqb4JK5r
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 22, 2025
भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी कॅनडा ठरला पात्र...
कॅनडाचा संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि या स्पर्धेत ते अनेक मोठ्या संघांना कठीण आव्हान देताना दिसतात. कॅनडाच्या संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या गोलंदाजांनी जोरदार गोलंदाजी करून विरोधी संघाच्या फलंदाजांवर दबाव आणला आहे आणि उर्वरित सामन्यांमध्येही ते असेच करताना दिसतात.
कॅनडा व्यतिरिक्त, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अमेरिका हे या स्पर्धेत आतापर्यंत पात्र ठरलेल्या संघांची नावे आहेत.
आणखी 7 संघ अद्याप पात्र ठरलेले नाहीत. यापैकी दोन संघ युरोप पात्रता फेरीतून, दोन अमेरिका पात्रता फेरीतून आणि तीन आशिया-ईएपी पात्रता फेरीतून प्रादेशिक पात्रता फेरीतून पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होतील. भारत आणि श्रीलंकेला यजमान म्हणून थेट प्रवेश मिळाला आहे.
हे ही वाचा -





















