एक्स्प्लोर
Eng vs Ind 2nd Test : ज्याचं नाव ऐकून फलंदाज घाबरतात... 'तो' 4 वर्षांनी पुन्हा येतोय, इंग्लंडसाठी गुड न्यूज; टीम इंडियासाठी वाजली धोक्याची घंटा
Jofra Archer News : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळला जात आहे.
Eng vs Ind 2nd Test Jofra Archer News
1/9

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळला जात आहे.
2/9

दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना 02 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळला जाणार आहे.
3/9

या सामन्यापूर्वी इंग्लंड संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे.
4/9

इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुसरा कसोटी सामना खेळू शकतो.
5/9

दुसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी आर्चर ससेक्ससाठी काउंटी क्रिकेट खेळेल.
6/9

स्काय स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, जोफ्रा आर्चर ससेक्ससाठी आगामी काउंटी सामना खेळेल आणि याद्वारे तो रेड बॉल क्रिकेटमध्ये परतेल.
7/9

काउंटी चॅम्पियनशिपच्या या सामन्यासाठी त्याचे नाव संघात नव्हते. पण आता बातमी अशी आहे की त्याला संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
8/9

जर तो ससेक्ससाठी काउंटी सामने खेळला तर तो भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात परतू शकतो.
9/9

आर्चरने 2021 पासून इंग्लंडसाठी कोणताही रेड बॉल सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत तो 4 वर्षांनी या फॉरमॅटमध्ये परतणार आहे.
Published at : 22 Jun 2025 05:26 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















