Chandrakant Patil on Bumrah : राजकारणच नाही, तर क्रिकेटमध्येही चंद्रकांत पाटील यांना रस, बुमराहच्या फटकेबाजीनंतरची दादांची पोस्ट पाहिलीत का?
Jasprit Bumrah : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिका धावा करण्याचा विश्वविक्रम जसप्रीत बुमराहने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात केला आहे.
IND vs ENG : सध्या भारताचा कर्णधार असणाऱ्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. त्याने एका षटकात 35 धावा कुटल्या असून कसोटी सामन्यात एका षटकात ठोकण्यात आलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. त्यामुळे बुमराहच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड झाला सर्वचजण त्याचं कौतुक करत आहेत. पण या सर्वामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही बुमराहचं कौतुक केलं आहे. म्हणजे कायम राजकारणाच्या पीचवर बॅटिंग करणारे चंद्रकांत दादा क्रिकेटमध्येही रस ठेवतात हे समोर आलं आहे.
दादांनी फेसबुक, ट्वीटर अशा आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन बुमराहचा फोटो पोस्ट करत त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. यावेळी बुमराहचा एक फोटोही त्यांनी पोस्ट केला असून सोबत बुमराहने केलेल्या 35 धावा त्याच ब्रॉड या गोलंदाजाविरुद्ध झाल्या आहेत, ज्याच्याविरुद्ध युवराजने 36 धावा 2007 साली टी20 क्रिकेटमध्ये केल्या होत्या. असंही लिहिलं आहे.
पाहा पोस्ट
कशी होती ओव्हर?
भारताच्या डावातील 84 व्या षटकात बुमराहने पहिल्या चेंडूपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बॉल वाईडच्या दिशेने जात चौकार गेला. मग तिसरा चेंडू नो बॉल होता ज्यावर बुमराहने षटकार उडवला. मग सलग तीन चौकार ठोकल्यावर पाचव्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर अखेरच्या चेंडूवरही बुमराहने एक धाव घेतली. ज्यामुळे कसोटी सामन्यातील एका षटकात 35 धावा ठोकण्याचा विक्रम बुमराहने केला आहे. या ओव्हरमध्ये बुमराहने केलेल्या फटकेबाजीचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा-