(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 Mini Auction: चेन्नईनं ज्याला दाखवला बाहेरचा रस्ता, आता त्याच खेळाडूवर लागणार कोट्यवधी रुपयांची बोली!
IPL 2023 Mini Auction: आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी (IPL 16) येत्या 23 डिसेंबरला कोची येथे मिनी ऑक्शन होणार आहे.
IPL 2023 Mini Auction: आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी (IPL 16) येत्या 23 डिसेंबरला कोची येथे मिनी ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनपूर्वी अनेक फ्रँचायझीनं त्यांच्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीसीकडं (BCCI) सोपवली. पण सर्वात मोठा फटका चेन्नईच्या संघाला बसला आहे. चेन्नईनं युवा खेळाडू एन.जगदीशनला (N.Jagadeesan) रिलीज केलंय. ज्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातलाय. एन.जगदीशननं नुकतीच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबरदस्त फलंदाजी केली. ज्यात अरूणाचल प्रदेशविरुद्धच्या 277 धावांच्या विक्रमी खेळीचा समावेश आहे. यामुळं मिनी ऑक्शनमध्ये त्याच्यावर मोठी बोली लागण्याची दाट शक्यता आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये एन. जगदीशननं देशातंर्गत क्रिकेट स्पर्धेत धावांचा पाऊस पाडलाय. दरम्यान,रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एन. जगदीशनचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. विजय हजारे ट्रॉफीत त्यानं सलग 5 सामन्यात 5 शतकं ठोकण्याचा कारनामा केलाय. याशिवाय त्यानं अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात 277 धावांची खेळी केली,जी लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यानं विजय हजारे ट्रॉफीच्या 8 सामन्यात 138 च्या सरासरीनं 830 धावा केल्या. यामुळं एन. जगदीशनचा संघात समावेश करण्यासाठी अनेक फ्रँचायझी त्याच्यावर मोठी बोली लावण्यासाठी तयार असेल.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये एन.जगदीशनची दमदार कामगिरी
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत एन जगदीशन तामिळनाडूच्या संघाचं प्रतिनिधित्व करतो. नुकतीच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत भल्याभल्या गोलंदाजांनी त्याच्यासमोर गुडघे टेकले होते. एन. जगदीशननं आपला फॉर्म कायम ठेवला आहे. त्यानं सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीतही शतक झळकावलंय. गट सामन्यात दुसऱ्या दिवशी हैदराबाद विरुद्ध एन. जगदीशनने 116 धावांची शानदार खेळी केली. या डावात त्यानं 95 चेंडूंचा सामना केला. तसेच या खेळीत त्यानं 16 चौकार आणि तीन षटकार मारले.
चेन्नईनं रिटेन केलेले खेळाडू
एमएस धोनी, रविंद्र जडेजा, डेवोन कोन्वे, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अंबाती रायडू, ड्वेन प्रिटोरियस, महीश तीक्ष्णा, प्रशांत सोळंकी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर, मथीसा पाथीराना आणि सुभ्रांशू सेनापती.
या देशांतील खेळाडूंचा आयपीएलमध्ये समावेश
कोची येथे होणाऱ्या या मिनी ऑक्शनमध्ये भारताचे एकूण 273 खेळाडू असतील. तर, इंग्लंडचे 27 खेळाडू, दक्षिण आफ्रिकेचे 22 खेळाडू, ऑस्ट्रेलियाचे 21 खेळाडू, वेस्ट इंडिजचे 20 खेळाडू, न्यूझीलंडचे 10 खेळाडू, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे 8 खेळाडू, आयर्लंडचे 4 खेळाडू, बांगलादेशचे 4 खेळाडू, झिम्बाब्वेचे 2 खेळाडू, नामिबियाचे 2 खेळाडू, नेदरलँड आणि यूएई यांच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आलाय.
हे देखील वाचा-