भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरला, नेट्समध्ये केला गोलंदाजीचा सराव
पाकिस्तानविरुद्ध सामन्यात गोलंदाजी करताना भुवनेश्वरच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे तिसरं षटक अर्धवट सोडून त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली होती.
![भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरला, नेट्समध्ये केला गोलंदाजीचा सराव bhuwaneswar kumar bowled on indoor nets but he will not play aginst west indies भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरला, नेट्समध्ये केला गोलंदाजीचा सराव](https://wcstatic.abplive.in/mh/prod/wp-content/uploads/2019/06/Bhuvaneshwar-Kumar1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लंडन : टीम इंडियाच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरला आहे. त्याने विश्वचषकात पुनरागमन करण्याच्या दृष्टीनं इनडोअर नेट्समध्ये गोलंदाजीचा सरावही सुरु केला आहे.
पाकिस्तानविरुद्ध मॅन्चेस्टरच्या सामन्यात गोलंदाजी करताना भुवनेश्वरच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले होते. त्यानंतर त्याला आठ दिवस गोलंदाजी करण्यास मनाई करण्यात आली होती. आज भुवनेश्वरने जवळपास अर्धास तास सराव केला. यावेळी कर्णधार विराट कोहली, विजय शंकर आणि रविंद्र जाडेजा यांनी देखील सराव केला.
यावेळी निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद, गगन खोडा आणि जतिन परांजपे हे देखील उपस्थित होते. प्रसाद यांना भुवनेश्वर आणि फिजिओ दोघांसोबत बातचित केली. तरीही भुवनेश्वर गुरुवारी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. मात्र 30 जून रोजी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यात भुवनेश्वरचं संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानविरुद्ध सामन्यात गोलंदाजी करताना भुवनेश्वरच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे तिसरं षटक अर्धवट सोडून त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर भुवनेश्वरला अफगाणिस्तान आणि विंडीजविरुद्धच्या सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे. भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीला संघात संधी देण्यात आली. या संधीचं सोनं करत शमीने अफगाणिस्थान विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेत चार विकेट घेतल्या.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)