(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सचा क्रिकेटमधून ब्रेक! जाणून घ्या काय आहे कारण?
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय. आयसीसीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
Ben Stokes: इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी रात्री ट्विट करुन ही माहिती दिली. स्टोक्सच्या या निर्णयाने, ज्याने इंग्लंड संघाला अनेक महत्त्वाच्या प्रसंगी त्याच्या चमकदार कामगिरीने विजय मिळवून दिलाय, सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. इंग्लंड संघासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. मंडळाच्या म्हणण्यानुसार, आपली मानसिक प्रकृती सुधारण्यासाठी आणि दुखापतीतून सावरण्यासाठी स्टोक्सने हा निर्णय घेतला आहे. तसेच 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध खेळल्या जाणार्या कसोटी संघातही तो सहभागी होणार नाही. त्याच्या जागी क्रेग ओव्हरटनला संघात स्थान देण्यात आले आहे.
BREAKING: England's star all-rounder Ben Stokes has taken an indefinite break from all cricket with immediate effect. pic.twitter.com/lcQSAMYUGt
— ICC (@ICC) July 30, 2021
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विट करून माहिती दिली
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आहे, ज्यात तो ब्रेक घेत असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. याशिवाय ब्रेक घेण्याचे कारणही निवेदनात देण्यात आले आहे.
मंडळाने निवेदनात काय म्हटले?
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) स्पष्ट केलंय की इंग्लंडचा पुरुष अष्टपैलू बेन स्टोक्स तात्काळ सर्व क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेणार आहे. स्टोक्सने त्याच्या मानसिक आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी आणि हाताच्या बोटाच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी ब्रेक घेतला आहे. त्याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही माघार घेतली आहे.
Official Statement: Ben Stokes
— England Cricket (@englandcricket) July 30, 2021
बोर्डाने म्हटले आहे की, “ईसीबी बेनच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन करते आणि आम्ही या काळात त्याला खेळातून दूर ठेवण्यास मदत करत राहू.” इंग्लंडच्या पुरुष क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक अॅश्ले जाइल्स म्हणाले, की उघडपणे बोलण्याचे मोठे धाडस त्याने दाखवले आहे. आमची प्राथमिकता नेहमीच आपल्या सर्व लोकांच्या मानसिक आरोग्यावर आणि कल्याणावर असते."
दरम्यान, बेन स्टोक्सच्या जाण्याने इंग्लंड संघाला त्यांची कमतरता जाणवेल. 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका खेळली जाणार आहे.