AUS vs ENG 5th Test : बेन स्टोक्स OUT की नॉट आउट?, ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड सामन्यात पुन्हा ड्रामा, मैदानात खळबळ उडाली, नेमकं काय घडलं? पाहा Video
Australia vs England 5th Test : इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जातो.

Ben Stokes OUT or Not OUT Controversial : इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जातो. फलंदाजी असो वा गोलंदाजी... दोन्ही विभागांत स्टोक्स सातत्याने संघासाठी निर्णायक कामगिरी करत आला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची गोलंदाजी जगात तोडीस तोड मानली जाते. त्यामुळे जेव्हा स्टोक्स आणि स्टार्क आमनेसामने येतात, तेव्हा तो सामना ‘बेस्ट विरुद्ध बेस्ट’ ठरतो. अॅशेस मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यातही असाच थरार पाहायला मिळाला.
मात्र, सिडनीत या लढतीत मिचेल स्टार्कने इंग्लंडच्या कर्णधारावर वर्चस्व गाजवले. बेन स्टोक्सने या डावात 11 चेंडू खेळले, पण एकही धाव न करता बाद झाला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर स्टोक्स आऊट झाला आणि त्याचबरोबर त्याच्या नावावर एक नकोसा, लाजिरवाणा विक्रमही जमा झाला. दरम्यान, त्याच्या बाद होण्यावरून मोठा वाद निर्माण झाला.
Mitchell Starc once again had Ben Stokes' number. Did you agree with the review?#Ashes | #DRSChallenge | @Westpac pic.twitter.com/Byqcl4peem
— cricket.com.au (@cricketcomau) January 4, 2026
स्टोक्सच्या बाद होण्यावर इतका गदारोळ का?
स्टोक्सच्या बाद होण्यामागील मुख्य वादाचा मुद्दा असा की, स्निकोमीटरवर दिसलेला स्पाईक चेंडू बॅटजवळून गेल्यानंतर काही फ्रेम्सनंतर दिसला. हलका आवाज ऐकू आला खरा, पण तो आवाज बॅटला लागल्यामुळे आला की पॅडला लागल्यामुळे, हे स्पष्ट नव्हते. अनेक चाहत्यांचा असा दावा आहे की, तो आवाज स्टोक्सच्या बॅटचा नव्हता, तर दुसऱ्याच कारणामुळे आला असावा. विशेष म्हणजे, या मालिकेच्या आधीच्या सामन्यांमध्येही स्निको तंत्रज्ञानामुळे वाद निर्माण झाले होते.
Without Any Doubt, This was Not Out. We can clearly see the ball touched his elbow and there was spike on Snicko after ball passed his Bat. Same Old Aussies Always Cheating. pic.twitter.com/u8VZt1i8iS
— Aryan Goel (@Aryan42832Goel) January 4, 2026
यावर अॅडम गिलख्रिस्ट काय म्हणाला?
कॉमेंट्री करताना माजी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट म्हणाला, “बेन स्टोक्स फक्त मान हलवतोय. तो या निर्णयावर अजिबात समाधानी नाही. मिचेल स्टार्कलाही सुरुवातीला खात्री नव्हती, पण ऑस्ट्रेलियाने घेतलेला रिव्ह्यू त्यांच्या बाजूने गेला.”
कसोटी क्रिकेटमध्ये मिचेल स्टार्कने 14व्यांदा केला बेन स्टोक्स OUT
कसोटी क्रिकेटमध्ये मिचेल स्टार्कने बेन स्टोक्सला तब्बल 14 वेळा बाद केले आहे. त्यामुळे स्टोक्सच्या कारकिर्दीत त्याला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज म्हणून स्टार्क अव्वल स्थानी पोहोचला आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, स्टार्कसमोर स्टोक्सला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागला आहे. या बाबतीत स्टार्कने भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने स्टोक्सला एकूण 13 वेळा बाद केले होते.
अश्विन आणि स्टार्क व्यतिरिक्तही काही गोलंदाज असे आहेत, ज्यांच्यासमोर स्टोक्सला कसोटी क्रिकेटमध्ये वारंवार शरणागती पत्करावी लागली आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा नाथन लायन असून त्याने स्टोक्सला 10 वेळा बाद केले आहे. तसेच भारताचा अनुभवी फिरकीपटू रविंद्र जडेजाने बेन स्टोक्सला एकूण 8 वेळा आपला बळी बनवले आहे.
हे ही वाचा -





















