Ben Duckett Ind vs Eng : इंग्लंडचं 'ट्रंप कार्ड' तळपलं, टीम इंडियासाठी धोक्याची घंटा वाजली! 'हा' पठ्ठ्या ठरणार 'गंभीर'ची डोकेदुखी
Ind vs Eng Test Series : इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामाच्या समाप्तीनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल.

Ben Duckett Ind vs Eng : इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामाच्या समाप्तीनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. पण याआधी डावखुरा इंग्लिश फलंदाज बेन डकेटने भारतीय संघाच्या अडचणी वाढवल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यासारखी फलंदाजी करून त्याने (Ben Duckett) फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या भूमीवरून टीम इंडियासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत डकेट टीम इंडियाच्या गोलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. डकेटने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धुडकावून लावले आणि 100 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
Ben Duckett in full flow at Trent Bridge 🔥🔥🔥 pic.twitter.com/TmCpRRYmOB
— England Cricket (@englandcricket) May 22, 2025
डकेट भारतीय गोलंदाजांसाठी ठरणार डोकेदुखी...
झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चार दिवसांच्या कसोटी सामन्यात बेन डकेट सुरुवातीपासूनच उत्तम लयीत दिसला. तो तुफानी पद्धतीने फलंदाजी करताना दिसला. डकेटला दुसऱ्या टोकाकडून जॅक क्रॉलीचीही चांगली साथ मिळाली आणि दोघांनीही फक्त 20 षटकांत 100 धावांचा टप्पा ओलांडला. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर डकेटने आपली चमकदार फलंदाजी सुरू ठेवली आणि 100 चेंडूंमध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले. डकेटने 134 चेंडूत 140 धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्या खेळीदरम्यान, इंग्लिश सलामीवीराने 20 चौकार आणि 2 षटकार मारले.
💯 runs 💯 balls 🙌
— England Cricket (@englandcricket) May 22, 2025
A home hundred for Ducky! 🏟@BenDuckett1 | @IGcom pic.twitter.com/vder7Uh3yF
आगामी कसोटी मालिकेत डकेट भारतीय गोलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. इंग्लंडचा हा सलामीवीर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि गेल्या 12 डावांमध्ये त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. जर डकेटने भारताविरुद्ध हाच फॉर्म सुरू ठेवला तर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.
झिम्बाब्वे 22 वर्षांनी इंग्लंडमध्ये पोहोचला...
झिम्बाब्वेचा संघ 22 वर्षांनी इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सामना खेळण्यासाठी आला आहे. झिम्बाब्वेने इंग्लंडमध्ये शेवटचा कसोटी सामना 2003 मध्ये खेळला होता. पण, झिम्बाब्वे इंग्लंडविरुद्ध फक्त एकाच कसोटी सामना खेळणार आहे. या कसोटी सामन्याद्वारे, इंग्लंड भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीचा आढावा घेईल. भारताविरुद्धची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे.
हे ही वाचा -



















