BCCI President: 1983च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचं सदस्य रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याची दाट शक्यता आहे. एवढेच नव्हे तर, या पदासाठी रॉजर बिन्नी यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दरम्यान, 18 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयची सर्वसाधारण सभा होणार असून त्यात बोर्डाच्या अध्यक्षपदाची घोषणा केली जाणार आहे.यादरम्यान, तृणमूल काँग्रेसकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) भाजपात प्रवेश करण्यास नकार दिल्यानंच त्याला बीसीसीआय अध्यक्षपदावरून हटवण्यात आलंय,असा आरोप तृणमूल काँग्रेसचं प्रवक्ते कुणाल घोष (Kunal Ghosh) यांनी केलाय. 


कुणाल घोष काय म्हणाले?
“भाजपानं गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्यादरम्यान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा उठवली होती. परंतु, सौरव गांगुलींनी राजकारणात प्रवेश करणार असल्यांच्या वृत्तांना फेटाळून लावलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी सलग दुसऱ्यांदा कायम राहण्याची शक्यता आहे. मात्,र सौरव गांगुलीना पद नाकारण्यात आलंय, हे राजकीय सूडबुद्दीचं उदाहरण आहे, असा आरोप कुणाल घोष यांच्याकडून करण्यात आलाय. 


मुंबईत 18 ऑक्टोबरला बीसीसीआयची सर्वसाधारण सभा
मुंबईत 18 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयची सर्वसाधारण सभा होणार असून त्यात बोर्डाच्या अध्यक्षपदाची घोषणा केली जाईल. विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या पदावर कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुलीला आयपीएल कमिशनरची जबाबदारी ऑफर करण्यात आली. मात्र, सौरव गांगुलीने या पदास नकार दिला. त्यानंतर केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे भाऊ अरुण सिंह धुमळ याच्याकडं आयपीएलच्या कमिशनरपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. ते ब्रिजेश पटेलच्या जागी कार्यभार संभाळतील.


डॉ. शांतनू घोष यांची प्रतिक्रिया
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ. शांतनू घोष यांनीही सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड न झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं. " राजकीय सूडाचे आणखी एक उदाहरण. अमित शहा यांचा मुलगा पुन्हा सचिवपदी बसू शकतो, पण सौरव गांगुली नाही. ममता बॅनर्जी या राज्यातील असल्यामुळं की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळे?" अशा शब्दात डॉ. शांतनू घोष यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलीय.


भाजपकडून तृणामूल काँग्रेसच्या आरोपांचं खंडण 
तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे  भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटलंय. "सौरव गांगुलीचा भाजपमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न कधी झाला? हे आम्हाला माहीत नाही. सौरव गांगुली हा क्रिकेट जगतातील एक दिग्गज आहे. पण काही लोक बीसीसीआयमध्ये होत असलेल्या बदलांवर मगरीचे अश्रू ढाळत आहेत." सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष होण्याआधी कधी कोणतं पद भूषवलं होतं का? असाही सवाल दिलीप घोष यांच्याकडून उपस्थित करण्यात केला. टीएमसीनं प्रत्येक मुद्द्यावर राजकारण करणे टाळावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 


हे देखील वाचा-